इ.स. १९८५ मध्ये कोलंबो समिती, कोलंबो, श्रीलंका येथे झाली व या समितीत पुढील सदस्य होते, पूज्य हिक्कादुवे सुमंगल थेरा ( अध्यक्ष ), पूज्य मीगेत्तूवेत्ते गुनानंद थेरा, डोनाल्ड डॉन कारोलीस हेवाविथारणा ( Don Carolis Hewavitharana ), अन्द्रीस बायर धम्मगुणवर्धना ( Andiris Baer Dharmagunawardhana), चार्ल्स ए. डिसिल्व्हा, पीटर डी. अब्रेऊ, विल्यम डी अब्रेऊ, विल्यम एल. फर्नांडोचा, एन,एस. फर्नांडोचा आणि कार्लिस पुजीथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता
बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमा (बुद्ध जयंती) या सणाच्या ब्रिटीश साम्राज्याखालील सुट्टीचा दिवशी फडकवण्यात आला.कर्नल हेन्री स्टील ओल्कोट या अमेरिकन पत्रकारांनी त्यात थोडा बदल सुचवला.
इ.स. १८८९ मध्ये सुधारित ध्वज सुरू करण्यात आला व जपानचे अंगारिका धम्मपाल आणि कर्नल ओल्कोट यांनी तो म्यानमारच्या सम्राटाकडे सुपूर्द केला.
इ.स. १९५२ मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला.
संप्रदायिक बौद्ध ध्वज कई वेगवेगळ्या बौद्ध विहारमध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वतःची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.
- जपानी जूडो शिंशू ध्वजात केसरी रंगा ऐवजी गुलाबी रंगामध्ये बदलेला आहे.
- थायलंडचा एक बौद्ध ध्वज आहे, जो पूर्णपणे मूळ बौद्ध ध्वज आहे पण त्यात धम्मचक्र आहे.
- नेपाळमधील तिबेटी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी भूरकट रंग वापण्यात आला आहे.
- म्यानमारमध्ये थेरवादी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाच्या स्थानावर गुलाबी रंगाचा उपयोग केला गेला आहे. हा रंग देशातील भिक्खुनींच्या वस्त्रांचा रंग आहे.
- थायलंडमध्ये थेरवाद बौद्ध लाल धम्मचक्र असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, अनेकदा आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजासोबत या ध्वजाची परेड केली जाते.
- गोशिमिकामाकू जपानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग झाला आहे.
- अशोकचक्र असलेला निळा भीम ध्वज भारतीय बौद्ध अनुयायांचा ध्वज आहे. हा ध्वज बहुतांश वेळा पंचशील ध्वजासोबतच फडवला जातो, हा निळा बौद्ध ध्वज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आंदोलनाचे प्रतिक आहे.
- कोरीयन बौद्ध पांढरा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात ज्यात लाल रंगाचे स्वस्तिक आहे.
- सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, ज्यामध्ये निळा, पिवळा आणि लाल रंग आहे
बौद्ध ध्वजातील पाच रंगांचे अर्थ
- निळा : प्रेमळवृत्ती व दयाळूपणा, शांती आणि वैश्विक करूणा.
- पिवळा : मध्यम मार्ग, टोकाची भूमिका त्याज्य, निश्चल शांतता.
- लाल : यशसिद्धी, शहाणपण, सदाचार, संपन्नता व प्रतिष्ठा.
- पांढरा : धम्म शुद्धता, सर्वत्र स्वातंत्र्यभिमुखताव निर्मलता.
- नारंगी : ज्ञान व शहाणपण.
आणि सहावी सर्व रंगांचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन (aura’s spectrum) दर्शवते. तसेच हे एकत्रीकरण म्हणजे प्रकाशाचा सार Pabbhassara (essence of light).
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?