July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अजिंठा, वेरूळप्रमाणे पितळखोरा लेणीचे जपावे सौंदर्य दुर्लक्षित वारशाच्या संवर्धनाची गरज: अन्यथा ऐतिहासिक ठेवा होईल नामशेष

औरंगाबाद : ऐतिहासिक पितळखोरा लेणीचे नैसर्गिक आपत्तीसह संवर्धनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अतोनात नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ही लेणी पूर्णपणे नामशेष होण्याची भीती अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. पुरातत्व विभाग, वनविभाग व पर्यटन विभाग यांनी याकडे लक्ष देऊन अजिंठा, वेरुळ लेणीप्रमाणेच पितळखोरा लेणीचे संवर्धन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे,
पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. आजघडीला या लेणीकडे दुर्लक्ष होत आहे. सोयीसुविधांअभावी पर्यटकही पाठ फिरवितात. पितळखोरा येथे असलेल्या लेणी समूहातील क्रमांक ५च्चा बिहार लेणीच्या समोरील भागात इ.स. पूर्व १७० ते १५० च्या काळातील ‘अवसेना’ या दानदात्यांचा दान शिलालेख आहे. ऊन, वारा, पाऊस यामुळे या शिलालेखाची झीज होते असल्याचे आहे. या शिलालेखाच्या वर छत बांधून सदर शिलालेखाचे जतन व संवर्धन व्हावी. या ठिकाणी मधमाश्यांकडून करण्याचीही मागणी होत आहे. हल्ला होण्याचे प्रकार होतात. त्या आवश्यक उपाययोजना केल्या जात दृष्टीनेही उपाययोजना कराव्यात. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकान्यांनी सांगितले.
संवर्धनाकडे दुर्लक्ष

पितळखोरा ही महत्वाची लेणी आहे. राज्यातील ही पहिली लेणी आहे. मात्र या लेणीच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. अजिंठा लेणीप्रमाणे असलेल्या पितळखोरा लेणीतील चित्रे (पेंटिंग) सुरक्षित केली पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा चापर करून लेणीचे संवर्धन केले पाहिजे. त्याबरोबर सोयीसुविधा वाढविल्या पाहिजेत. स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा केली पाहिजे. रस्त्याची दुरवस्था दूर सूरज जगताप, लेणी अभ्यासक

वेरूळ आणि तुलनेत दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेली पितळखोरा लेणी. या लेणीचे संवर्धन करण्याची मागणी लेणी अभ्यासकांनी केली आहे.