औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. स्नेहा अमोल सहजराव हिने एच. एस्. सी. परिक्षेत ८९ % गुण मिळवून काॅलेज मधून चौथा क्रमांक पटकावून गौरवास्पद यश संपादन केले आहे. कु. स्नेहाने गणित या विषयात १०० पैकी ९८ गुण मिळविले आहेत. स्नेहा सध्या CET व JEE च्या परिक्षेची तयारी करीत असून नामांकित इंजिनिअरिंग काॅलेज मधून पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा तिचा दृढनिश्चय आहे.
स्नेहाचे इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी पर्यंतचे शिक्षण कन्नड येथे झाले असून इयत्ता चौथीपासून पुढील शिक्षण औरंगाबाद येथे चालू आहे. स्नेहा जशी अभ्यासात हुशार आहे तशीच ती हरहुन्नरी आहे. आम्ही दोघेही पती-पत्नी व्यवसायात व्यस्त असल्यामुळे आम्हाला व्यक्तिशः तिच्या अभ्यासाकडे लक्ष देणे जरा कठीणच जाते. परंतु स्नेहा स्वतःचा अभ्यास सांभाळून आपली छोटी बहीण पलकचाही अभ्यास करवून घेते तसेच तिच्या आईचा मुर्ती बनवून त्या विकण्याचा व्यवसाय असल्याने स्नेहा या कामातही आईला मदत करते आणि विशेष म्हणजे स्नेहाला मुर्त्या बनवायलाही आवडते. स्नेहाची हुशारी, काटकसरीपणा, समंजसपणा, मनमिळाऊपणा व हरहुन्नरीपणा यामुळे शाळेत तशीच सर्व सगेसोयरे व मित्रपरिवारात ती सर्वांची अत्यंत लाडकी आहे.
स्नेहा नेहमी वर्गात पहिली आलेली आहे व एस्. एस्. सी. परिक्षेतही तिने ८८% गुण मिळविलेले आहेत.
स्नेहाने शाळेत प्रत्येक कार्यक्रमानुरूप आपले भाषण कौशल्य दाखवून दिलेले असून ती डान्स व इतरही प्रत्येक कार्यक्रमात भाग घेते. स्नेहा जिद्दी, कष्टाळू आणि आत्मविश्वासू मुलगी आहे.
अशा या हरहुन्नरी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून घडत असलेल्या आमच्या कन्येचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व तिच्या उज्ज्वल, यशस्वी जीवनासाठी आमचे अनेक शुभाशिष.
🌹💐🌹
More Stories
NTA शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता VI आणि इयत्ता IX च्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत भरती – प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू
MPSC ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये