परभणी- जिंतूर तालुक्यात १० दिवसीय श्रामणेर चारिका धम्मपद यात्रा तथा १० गाव १० बौध्द परिषदेचे आयोजन💐
भारत भ्रमण भिक्खु संघ, समता सैनिक दल तथा बौद्ध समाज सम्यक सेवा समिती (BS4) जिंतूर तालुका यांच्या वतीने बौध्द धम्म प्रसार प्रचार आणि भारतीय संविधान प्रबोधन जागरासाठी दिनांक १८ ते २८ फेब्रुवारी २०२३ याकाळात जिंतूर तालुक्यातील प्रमुख १० गावांत १० बौद्ध परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील धम्म पदयात्रा दोनशे किमी पायी प्रवासाची असून या धम्मपद यात्रेत तालुक्यातील जवळपास शंभराहून अधिक गावे जनसंपर्काने जोडली जाणार आहेत. दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ : ०० वाजता शहरातील सम्राट अशोक बुध्द विहारात पूजनीय भिक्खु संघाच्या हस्ते संयोजकांकडे नावनोंदणी केलेल्या उपासकांना श्रामणेर दिक्षा दिली जाणार आहे.
त्यानंतर सदरील यात्रा मराठवाडा दीक्षाभूमी बोरीकडे प्रस्थान करणार आहे. पुढे दुधगाव, आसेगाव, वस्सा, आडगाव फाटा, भोगाव, ईटोली, सावळी, एलदरी, माणकेश्वर, आंबरवाडी, कोरवाडी, कवडा, वाघी धानोरा, नवहाती ब्राह्मणगाव कान्हा, चारठाणा, जोगवाडा, रायखेडा मालेगाव अकोली मार्गे संपूर्ण जिंतूर तालुक्यात २०० किमी चारिका पदयात्रा करून दिनांक २८ फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी ०२:०० दोन वाजता जिंतूर शहरात आगमन करणार आहे.
प्रमुख मुक्काम असणाऱ्या गावांमध्ये बौध्द परिषद आयोजित करण्यात आल्या असून प्रत्येक परिषदांना ग्रामीण भागातील हजारो बौध्द उपासक उपासिकांची उपस्थिती राहणार आहे. पूजनीय श्रामणेर तथा भिख्खू संघ एक धम्मरथ शेकडो धम्मसेवक आणि हजारो उपासक उपासिका या चारिका धम्म पदयात्रेत सहभागी होणार आहेत. मुक्कामी गावात पूजनीय भिक्खु संघाची धम्मदेसना, व्याख्यान, एकपात्री नाट्यप्रयोग, भारतीय संविधान प्रबोधन कार्यक्रम, बुद्ध-भीमगीत कार्यक्रम, अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या धम्मपद यात्रेचा समारोह जिंतूर येथे २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता महा धम्मरॅली होणार असून प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन आणि भिख्खू संघाची धम्मदेसना होईल या कार्यक्रमाला बहुजन महापुरुषांचा अपमान करणाऱ्याच्या तोंडावर भिमटोला देणारे समता सैनिक दलाचे भिमयोध्दा मनोजभाऊ गरबडे, पुणे यांचा नागरी सत्कार होणार आयोजित केला असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक धम्मपद चारिका यात्रेत सहभागी होण्यासाठी ९०२८९१६०३६ या मोबाईल क्रमांकावर कॉल करून नावनोंदणी करावी, किवा आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
श्रामनेर चारिका धम्म पदयात्रा | Shramner Charika Dhamma Padayatra.
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा