दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या बुद्ध लेणी येथे कार्यशाळा संपन्न झाली, नवी मुंबई , मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, चाळीसगाव, इत्यादी ठिकाणाहून मोठ्या संख्येने धम्मलिपि अभ्यासक, लेणी अभ्यासक व पाली भाषेचे अभ्यासक ह्या कार्यशाळेत सहभागी झाले होते,
सर्वप्रथम चैत्यगृहाच्या आतील भागाची साफसफाई करण्यात आली, त्यानंतर चैत्यस्तुपाची सजावट करून त्रिसरण पंचशील सामूहिक रित्या घेऊन 10 मिनिटे ध्यानसाधना घेण्यात आली,
संस्थेचे सुनील खरे , संतोष अंभोरे, प्रविण जाधव यांनी शिवनेरी लेणीची इत्यंभूत माहिती सांगितली,
धम्मलिपि तज्ञ सुनील खरे ह्यांनी धम्मलिपि मध्ये असलेल्या पालेभाषेतील लिहिलेल्या लेखाचे वाचन करून त्याचा सविस्तर अर्थ सांगितला,
चैत्यगृहाच्या बाहेरील शिलालेख वाचन (धम्मलिपी ) वीरसेणकस गहपति पमुघस धमनिगमस देयधंमं चेतियघरो नियुतो सव लोक हित सुखाय मराठी अर्थ (भाषांतर) वीरसेनाक गृहपती प्रमुख धम्मनिगम ह्यांनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी, सुखासाठी या चैत्यगृहासाठी पुण्यकारक दान दिले.
संतोष अंभोरे ह्यांनी स्तूप का निर्माण करण्यात आले? त्याची गरज का पडली ?तसेच काळानुसार स्तूपामध्ये कधी ,कशा पद्धतीने बदल झाले. सर्वांना समजेल अशी सोप्या भाषेत माहिती दिली.ही ऐतिहासिक धरोवर जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याची जाणीव करून दिली. या एकंदरीत लेणी प्रवासामध्ये सर्वच सहकार्यांनी एकमेकांना मैत्री भावनेने सोबत घेऊन,एक दुसऱ्याला धीर देत आनंदा मध्ये प्रवास पूर्ण केला. नवी मुंबई टीमचे अर्चना वाघमारे, सुजाता आव्हाड यांनी नवीमुंबईच्या बांधवांसाठी सर्वच प्रकारचे खूप छान पद्धतीने नियोजन केले.आणि सर्वांना शिवनेरी लेणी अभ्यास वर्गाचा आनंद मिळवून दिला विशेष करून लेणी उतरताना जो थरारक अनुभव आला तो अविस्मरणीय असा होता,
ह्या कार्यशाळेत नागपूर वरून निर्झरा रामटेके, अनामिका हाडके, मुंबई मधून रुपाली गायकवाड, आकाश हजारे, कैलास गायकवाड, अरविंद लोंढे, कविता शिंदे, ज्योती वाघ व पुण्यातुन संध्या ठमके, अशोक कांबळे, बारामती येथून रेखा शिंदे, दत्तात्रय शिंदे,
चाळीसगाव येथील मिलिंद भालेराव, जयपाल पगारे, व नाशिक वरून राजू पगारे, निलेश गांगुर्डे व इतरही भागातून मोठ्या संख्येने अभ्यासक उपस्थित होते.
Shivneri Buddha Caves study workshop concluded under Danparamita Foundation Nashik
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा