‘आकाशाशी जडले नाते ‘सह अनेक पुस्तकं लिहिणारी लेखणी शांत
जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती होती. खगोलशास्त्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना अनेकांच्या मनात आत्ता आहे. डॉ. जयंत नारळीकर रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रिज या विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आज पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
जयंत नारळीकर यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. तसेच डॉ. नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
▪️ जयंत नारळीकर यांची पुस्तकं
* अंतराळातील भस्मासुर
* अंतराळातील स्फोट
* अभयारण्य
* चला जाऊ अवकाश सफरीला
* टाइम मशीनची किमया
* प्रेषित
* यक्षांची देणगी
* याला जीवन ऐसे नाव
* वामन परत न आला
* व्हायरस
▪️ जयंत यांना विज्ञानाचं बाळकडू घरातून मिळालं
डॉ. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय एलर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व बक्षिसे त्यांनी पटकावली
सोप्या भाषेत विज्ञान समजावणं ही त्यांच्या लेखनाची खासियत
▪️जयंत नारळीकर यांनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तकें लिहिली. ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळाली. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात.
▪️ नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार
* १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार
* २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार
* २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
More Stories
Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा परिवर्तनशील धाडशी निर्णय – ॲड. अनिल वैद्य
Chevening Scholarship म्हणजे काय ?
१ लाख धम्म सेवक–सेविका नोंदणी अभियान : धम्माच्या जागृतीसाठी ऐतिहासिक पाऊल