घुग्घुस – दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून घुग्घुस येथे पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस, यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चा अनुषंगाने “चलो बुध्द की और’ पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे मोहिम सुरू करण्यात आले.
आठवड्यात एक दिवस दर रविवार ला दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत आपण आपल्या परिवारासोबत विहार मध्ये दोन तास समाजासाठी द्यावा या” चलो बुध्द की और’ मोहीम मध्ये आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म, मेडीटेशन, शिक्षण विषय, जनरल नॉलेज, या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी या मोहिमेचा सर्व घुग्घुसवासीयांनी लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
“चलो बुध्द की और’ मोहीमचा आज दुसरा रविवार आज दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी मोहिमेला खुप मोठ्या संख्ये विहार मध्ये महिला व लहान मुल उपस्थित होते. या लहान लहान आज रविवार ला मुलांना मार्गदर्शक करण्यासाठी म्हणून लाभलेल्या मुख्य मार्गदर्शक आयुनी. अश्वीनी नलभोगा व आयुनी. प्रतिक्षा लभाने, आयुनी. वनिता निखाडे, आशा वर्कस विद्या दूबे व सुजाता देशकर. यानी लहान मुलांना मार्गदर्शक केले.
विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, यशोधरा महिला मंडळ घुग्घुस अध्यक्षा, आयुनी. रिता देशकर, केंद्रीय शिक्षिका आयु.माया सांड्रावार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोहीम चे संचालन आयुनी. सूषमाताई घोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन छोटी बालिका भारती पाझारे यांनी केले
यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, यशोधरा महिला मंडळ उपाध्यक्षा प्रतिमाताई कांबळे, शोभा पाईकराव, वाघमारे, वनकर, टिपले व समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा