वेडात उभे झाले शूरवीर ते चार !
तो महाशिवरात्री २००६ चा दिवस होता . बोरिवली पूर्वेला संजयगांधी उद्यानाला बिलगून असलेल्या डोंगररांगात सर्वांत पुरातन १२७ कान्हेरी कॅव्हेज मधून बुध्द गुंफा आहेत . लेणी क्र . २ च्या गॅलरीसारख्या दोन्ही भागात , डोंगरातील कातळ पोखरुन भगवंताच्या उभ्या प्रतिमा , ज्यामध्ये भगवंताचे लोभस आणि प्रसन्न चेहरा आर्शिवाद देणारा हात , खांदयावरुन पायाच्या दिशेने गेलेले चिवर हे सगळे दृश्य मन मोहून टाकणारे आहे . गॅलरीचा आयात आकाराचा परिसर त्याला जोडून जाळीचा दरवाजा आहे . दरवाज्यातून आत जाताच डोंगराच्या पोटात असलेले १५०’X ३० ‘ सभागृह दरवाज्याच्या बारोबर समारेच्या दिशेला असलेला स्तूप , शरीराला स्पर्श करणारी शितला हवा , कमालीची शांतता असलेले हे ठिकाण माणसाला स्वतःचे अस्तित्व विसरल्यासरखे होते .
लेण्याच्या प्रवेश द्वारा वरच ते चौघे तरुण उभे होते.हे ठिकाण म्हणजे हिंदूचे मंदिर आहे. हि आज पर्यंतची चालत आलेली प्रथा म्हणून शिवरात्रीच्या निमित्ताने पूजा आणि दर्शनासाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांना , हात जोडून हे तरुण , समजवण्याचा सुरात सांगत होते , यहा शिवजी का मंदिर नही ! आप फुलमाला, नारीयल,अगरबत्ती ये सब पूजा-अर्चा नही कर सकते!
महाशिवरात्रीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत चालली होती . गर्दी वाढत चालली आणि हम हरसाल आते है ! शिवजीका पूजा , भजन किर्तन कतरे है ! तूम लोग कोण होते हो, हमको रोकनेवाले ! म्हणून गर्दीचा आवाज वाढू लागला होता . गर्दी कधीही हिंसक होईल असे वाटत होते . आमचे हे चौधे तरुणा मात्र ठामपणे सांगत होते . यहाँ बुध्द लेणी है । आप लोग अंदर जा नहीं सकते . हम लोग अंदर जाने नहीं देंगे ।
लेणी समोर मोठा जामाव झालेला पाहून गर्दीला हाताने दूर करीत एक बुध्द भिक्षू येवून ते हया तरुणांच्या बाजूला झाले . गर्दीमध्ये असलेले बौध्द धार्मिय लोक त्या तरुणांच्या बाजूला झाले . त्याच दरम्यान दोन पोलिस हवालदार गर्दीत त्या दो हो बाजूच्या मध्ये उभे झाले . हवलदार साहेब आम्ही हया लोकांना सांगत आहोत . हे हिंदूचे मंदिर नही . हे लोक इच्छा पूर्तीसाठी स्तूपाला नारळ फेकून मारतात . फुले , हळदी कुंकू अगरबत्तीमुळे प्रदूषण वाढते. ते हया लेण्याला हानिकारक आहे . तरुणांचे म्हणणे त्या हवालदार दोघांना पटले .
मोठ्या संख्येने हिंदु भाविक जमलेत म्हणून त्यांना पूजा करून दर्शन घेवून द्यावे . असे नकरता त्या हवालदारांनी , त्या भाविकांना पूजा न करण्याची ताकीद दिली . त्याशिवाय लेण्याच्या दर्शनी भागावर मोठा पडदा लावला . अगदी दिवस मावळून अंधार पडे पर्यंत आमचे हे चार वीर बुध्द लेण्याच्या राखणासाठी थांवून होते .
दुसऱ्या दिवशी सम्राट पेपरच्या पहिल्या पानावर आमच्या तरुणांनी बुद्ध लेण्याचं विदृपीकरण हाणून पाडलं. म्हणून मोठी बातमी छापून आली होती .
आपला लढा योग्य आहे. आणि आपण तो योग्य मार्गाने लढलो म्हणून यशस्वी झालो . हा आत्मविश्वासच बलावला म्हणून लेण्याच्या पूर्वेकडे एका मठाचे निर्माण झाले होते . तो मठ म्हणजे फार मोठया षड्यंत्राचा भाग होता . त्याच्या निर्माण कार्यात राजकारणी , अधिकारी , गुंडे मवाली साधू – भोंदू असे सर्वच प्रकारचे लोक होते . त्या मंडळीमुळे लेणीच धोक्यात येवू शकत होती .
ती जागा म्हणजे संजय गांधी उद्यानाचा भाग आहे. फॉरेस्ट , मुंबई महानगरपालिका , पुरातत्व विभाग , महाराष्ट्र राज्य, केंद्र सरकार , पोलीस खाते अशा अनेक खात्याचा संबंध येतो. आपल्या या चार वीरांनी प्रत्येक खात्यांशी पाठ पुरावा केला. एवढे मोठे बांधकाम झाले . तुम्ही काय करीत होता. मठाला पाणी , वीज जोडणी कुणी दिली , तिथे जे अनैतिक प्रकार चालत होते . पोलीस झोपले होते काय ? अशाप्रकारे सर्व संबंधित खात्यांना त्यांच्या कर्तव्याचा जाब विचारला म्हणून किल्ल्या सारखा मजबूत असलेला मठ जमिन दोस्त झाला.
वेडात उभे राहणारे शूरवीर नसल्यामुळे कार्ला आणि जुन्नर जवळची लेण्याद्री या ठिकाणी बुद्ध लेण्यांच विद्रुपिकरण उघड्या डोळयाने बघावे लागत आहे . काल दिनांक १ मार्च कान्हेरी केव्हजला गेलो होतो . भारतीय महासभा कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर साहेबांचा कार्यक्रम होता. खूप गर्दी होती. आमचे ते चार वीर भेटले. गेली १६ वर्ष त्यांची जागृती पाहून आनंद वाटला . महाशिवरात्री असून सुद्धा कोणीही पूजा अर्चा करणारा भाविक दिसला नाही .
वेडात उभे झाले शूरवीर ते चार !
✒️ समाज भुषण आद. आयु.सयाजी वाघमारे
📞 98 92 06 69 67 , 70 39 48 34 38
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
संकलन : विलास पवार , रायगड
📞91 37 66 2424
More Stories
पुरातत्त्वीय दिवाळखोरी – बुद्ध लेणींचे रूपांतर…!
दक्षिण कोरियाचा बौद्ध धर्म Buddhism in South Korea
राजर्षी शाहू छञपतींचा आज स्मृतीदिन !