भाव म्हणजे श्रद्धा , भाव म्हणजे प्रेम जे एक माणसाचे दुसऱ्या बरोबर असते,ज्यामुळे दोघांनाही जगण्यात आनंद मिळत असतो, ज्या ठिकाणी दोहोपेक्षा अधिक संख्येने लोक श्रद्धा, प्रेम या भावने बरोबर पुजा प्रार्थना , सणवार देव, लग्नाच्या चालीरीतेने जोडलेले असतात त्याला भावकी संबोधले जाते . त्यामध्ये सहजीवनाचा आनंद मिळतो. सहजीवनातून सहकार्याची भावना जागृत होते सहकार्यामुळे आज जगाचा विकास झाला.
सहकार्य करण्याची अंगभूत प्रेरणा असते. तशीच ती संस्कारातून सुद्धा येते . भावकी म्हणताच आमच्या गावच्या भावकीचे दिवस डोळ्यापुढे उभे रहातात आमचे गांव घोडेगांव जे तालुक्याचे गांव आहे. आपल्या राजवाड्यात ४० ते ५० महार समजाची घरे त्यापैकी ७ ते ८ मास्तर मंडळी एक कोर्टात बेलिफ, एक तलाठी, एक महसुल खात्यात शिपाई महादूबाबा घोड्याची खरिदीविक्री व्यवसायात, राहीलीली घरे महारकीच्या कामाला जुपलेली, असे असले तरी राजवाड्यात एकादी घटना प्रसंग घडल्यास सगळे एक होत होते.
त्या वेळी लग्नप्रसंगात घरापुढे चार बांबू रोवून आडव्या बांबूवर आंब्याचे डहाळे टाकून लग्नाचा मांडव सजवला जाई, ही सर्व कामे भावकीतले तरुण करीत असतं .आमच्या गावची पद्धत होती मृत व्यक्तीला चार फुट व्यास आणी सहाफुट खड्यामध्ये बसतीक्रिया करून मुठमाती घ्यायची हा खड्डा खोदणी म्हणजे अंत्यत जिक्रीचे आणि कष्टाचे काम असे . तरी देखिल भावकीतली मंडळी खंदयाला , खांदा लावून करीत असत लग्नं संबंधात काही तंटे बखेडे झाल्यास दोन्ही भावकीतली पंचमंडळी न्याय निवडा करीत होते .
नाना मस्तरांचा मुलगा पुण्याला नोकरीला लागला. दोघा बापलेकाचे पगार, शेतीची उत्पन्न येऊ लागल्या पासून त्याच्या वागण्या – बोलण्यात फरक पडू लागला होता. त्याच दरम्यान त्याची आई राधाबाई निर्वातली. मास्तर भावकितल्या कर्त्या मंडळीला विरोध करतो. काही घटना घडल्यास लांब लांब रहातो. वर्गणी देण्यास टाळाटाळ करतो. म्हणुन म्हातारीच्या अंतविधी कार्यक्रमापासून दूर रहाण्याचे भावकिने ठरविले असल्याचे, मास्तरला समजताच, तो हात जोडून भावकीच्या कर्त्यामंडळी समोर उभा झाला. म्हणजे भावकीसमोर कुणीही मोठा नाही. त्यामुळे भावकीत एकोपा टिकून होता .
१४ऑक्टोबर १९५६ रोजीच्य दीक्षा समारंभा नंतर धर्मांतरित झालेला पूर्वाश्रमिचा महार आणि आजचा बौध्द गांवा बरोबर भावकी सोडून शहराकडे आला. आजचा बौद्ध समाज रानोमाळ पसरल्या सारखा विस्तापित आहे . मृताची घटना घडल्यास, अंघोळ घाला ,अंघोळ कशाला पायावर पाणी घाला. मृत व्यक्तीच्या पत्नीचे कुंकू पुसणे, बांगड्या वाढविणे , पंचशील – त्रीशरण इथे म्हणा, सरणावर शेवटची वंदना ह्या विधी विषयी सूसूत्रता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , बौद्ध जयंती हे आमचे सण, बुद्धविहारा मधून निघणाऱ्या मिरवणुकी पुरतेच स्तिमित आहे. ह्या सणाच्या दिवशी एक बौध्द दुसऱ्या बौद्धाबरोबर,एक बौद्ध कुटुंब दुसऱ्या बौद्ध कुटुंबाबरोबर काय घेणे देणे लागते .
विस्तार भायास्तव एवढेच सूचित करावेसे वाटते. विस्तापित झालेल्या प्रत्येक बौध्द माणसाने, बौध्द संस्कृती अनुसार आपली बौध्द समाज भावकी निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय बौध्द म्हणून कुणावर प्रेम करणार , बौध्द म्हणुन कुणाला सहकार्य करणार ?
बौद्धांनी अंतर जातीय विवाह केले पाहजे, हा विचार पुढे येतो. त्या वेळेस आपण हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या घरी येणाऱ्या मुलीला आपण कोणती बौध्द संस्कृती अचारण करण्यास सांगणार आहोत .
बौध्द समाजाने मुलभूत विचार केला पाहिजेत !
✒️ आद. आयु सयाजी वाघमारे
📱703 948 3438 , 989 206 6967
संकलन : विलास पवार , कल्याण
📞 91 37 66 2424
More Stories
Buddhist Meditation : बौद्ध ध्यानासाठी संपूर्ण मार्गदर्शक: तत्त्वे, तंत्रे आणि फायदे
त्रिरश्मी बुध्दलेणी व वर्षावास परस्पर संबंध
सम्राट अशोकांच्या लिपिला “धम्मलिपि” च्या ऐवजी “ब्राह्मी” चा अट्टाहास धरणाऱ्यांना OPEN CHALLENGE’ – अतुल भोसेकर