भारतामध्ये सर्वात पहिली लेणीं कोरली ती सम्राट अशोकाने – बाराबर आणि नागार्जुनी डोंगरांमध्ये इ.स. पूर्व २७० साली. लेणीं कोरण्याची ही परंपरा सतत सुरु होती ते अंदाजे इ.स. ७ व्या शतकापर्यंत. कुडा येथील लेणे क्रमांक ६ हे सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी आणि सातवाहन सम्राट यज्ञसिरी यांच्या काळामध्ये कोरण्यात आले आहे .
त्याचप्रमाणे लेणी क्रमांक ९ , १०,११,१२,१३ लेणी इसवीसन १०० ते १८० च्या दरम्यान , लेणे क्रमांक १५ इसवीसनाच्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात , लेणी क्रमांक १६,१७,२१,२३,२४ ही इसवीसन १८० ते २५० या कालावधीमध्ये , लेणी क्रमांक ३,७ ही इसवीसन २३० नंतरच्या कालावधीमध्ये लेणी क्रमांक ४,१९ ही इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात लेणे क्रमांक १ हे इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी आणि लेणे क्रमांक ६ मधील काही शिल्पे इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी किंवा चौथ्या शतकाच्या सुरुवातीला कोरण्यात आली आहेत.
लेण्यांतील शिलालेखावरून लेणी क्रमांक १,३,६, मधील शिल्प कोरण्यासाठी महाभोज मादंव स्कंदपालित यांच्या कुटुंबानी दान दिलेलं आहे तर लेणी क्रमांक ११,१२ साठी राजमंत्री , राजवैद्य हाल यांची कन्या गोयम्मा हिने धम्मदान केलेल आहे तर लेणी क्रमांक १४,१८,२१ कोरण्यासाठी श्रेष्ठी वसुलनाक यांनी धम्मदानातून केलेली आहे .
कुडा लेणी कोरण्याची सुरवात सातवाहन सम्राटांच्या राजवटीमध्ये सुरू झालेले असून इसवीसनाच्या दुसऱ्या शतकामध्ये मादंव राजवंशानी लेणी कोरण्याचे कार्य सुरूच ठेवलेले होते असे आढळून येते .
त्याचप्रमाणे कुडा लेणी कोरण्याचे कार्य चौथ्या शतकापर्यंत महायान पंथीयांच्या काळापर्यंत सुरूच होते असेही दिसून येते . यावरून कुडा लेणी कोरण्याचे काम इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापासून इसवीसनाच्या चौथ्या शतकापर्यंत तीनशे वर्षे नियमित सुरू होते हेच सिद्ध होते .
महाराष्ट्राचा आद्य राजवंश म्हणजे सातवाहन राजवंश होय. महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजवंशानी इसवीसनपूर्व २३० ते इसवीसनाच्या २३० पर्यंत एकूण ४६० वर्षे राज्य केले . महाराष्ट्रामध्ये सातवाहन राजवंशानी मौर्य सम्राट अशोक यांच्या बौद्ध संस्कृतीच्या लेणांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये लेणी कोरण्यास सुरवात केली .
सातवाहन राजवंशातीलच सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन सम्राट यज्ञसिरी यांच्या कार्यकाळामध्ये कुडा येथे लेणी कोरण्यास सरुवात झाली .
त्यानंतरही सातवाहन राजवटीमध्ये अनेक लेण्यांची निर्मिती झाली . सातवाहन सम्राटांच्या राजवटीमध्येच मादंव राजवंशानी कुडा येथे लेणी कोरण्याचे काम सुरू ठेवले . महाभोज मादंव स्कंदपालित हे या भागाचे सातवाहनकालीन शासक होते असे लेणी मध्ये असणाऱ्या शीला लेखा वरून वाटते .
पुरातत्वज्ञ बरजेसयांच्या मते कुडा लेण्यातील शिलालेखात नमुद केलेले मादंव म्हणजेच मादांड असावे .
कुडा लेणी समुह कोरण्यास मांदव महाभोज स्कंदपालित , महाभोजी विजया , मांदव राजवंशाचा लेखक सुलसदत्त व उत्तरदत्ता यांचा पुत्र शिवभूती व त्याची पत्नी नंदा , भंदत सिवदत्त व सातिमित्र भदंत पातिमित्र , भदंत आगिमित्र , भिक्खूणी नागनिका , भिक्खूणी पदुमानिका , भिक्खूणी बोधी , भिक्खूणी आषाढमित्रा , शाक्योपिसिका व्याघ्रका , भदंत बुद्धसिंह , भदंत संघदेव , वैद्य उपासक इसिराखित यांचा पुत्र सोमदेव व त्यांचा पुत्र नाग , पुत्री धम्मा , सर्पा , मांदवप्रमुख सिवम त्याचा पुत्र कुमार मांदव , ब्राम्हण उपासक अयितिलु याची पत्नी भयिला , वधुक माळ्याचा पुत्र शिवपलित , राजमंत्री , राजवैद्य हाल याची कन्या गोयम्मा , महाभोज सुदर्शन याची कन्या विजयानिका , कहाडचे लोहार महिक , मांदव कोच्छिपुत्र वेलिदत , भदंत विजय ,भिक्खूणी सर्पिला , भिक्खूणी लोहिता , भिक्खूणी वेण्हूया , भिक्खूणी बोधी , माळी मुगदास , स्वामीपुत्र नाग , श्रेष्ठी वसुलनाक , पुसनाकाची माता व वेहमित्र व्यापाराची पत्नी शिवदत्ता , अचलदास व्यापाराचा पुत्र आसालमित्र या सर्व भिक्खूणी राजवंश , राजमंत्री , बहुजनातील ब्राम्हण , लोहार , माळी , व्यापारी , श्रेष्ठी उपासक ह्यांनी धम्म दान दिलं आहे
सदरील नाव ही आज ही लेणी मध्ये असणाऱ्या शीला लेखांमध्ये आढळतात.
More Stories
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu
गुजरात ने बौद्ध धर्म प्रसार कसा केला