February 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थीकलश दर्शनाचा लाभ घ्यावा – संजय भोसले

छत्रपती एक्सप्रेस राहुरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय भिख्खू महासंघाचे ११० बौद्ध भंते यांच्या उपस्थितीत परभणी ते मुंबई दरम्यान भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे नियोजन केले आहे. या दरम्यान तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदेश महासचिव संजय भोसले यांनी केले आहे

दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी ही धम्म यात्रा नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणार असून या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मार्गक्रमण कालावधीत धम्म यात्रा यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील परभणी ते दिक्षाभुमी दादर, मुंबई अशी भव्य बौद्ध धम्म यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबीरे, काँग्रेस विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पदयात्रेचे मुख्य समन्वयक राजेश लाडे, प्रदेश उपाध्यक्ष पदयात्रेचे मुख्य समन्वयक प्रशांत पवार, मुख्य सह समन्वयक संजय भोसले, श्रीमती प्रतिभाताई मोरे, नाशिक जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर काळे, मिलींद हाडोरे, अहमदनगर जिल्हा समन्वयक राजेंद्र वाघमारे जळगाव जिल्हा समन्वयक कैलास शेळके आदींनी केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने ज्ञानेश्वर काळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यात दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी अंदरसूल ( ता. येवला ) येथे प्रवेश करीत आहे. येथे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने या यात्रेत सहभागी भिक्खु संघ व इतर यात्रेकरूंचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. तसेच विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थीकलशाचा दर्शनाचा लाभ घ्यावा व पदयात्रा मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग महासचिव संजय भोसले यांनी केले आहे यावेळी विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू, रमेश साळवे, संजय भोसले, तसेच प्रदेश पदाधिकारी ज्येष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे, कुसुमताई चव्हाण, ज्युलीताई डिसुझा, जिल्हा सरचिटणीस मनोहर आहिरे, अशोक शेंडगे, राजेंद्र वाघमारे, अरुण दोंदे, इसाकभाई कुरेशी, दिनेश उन्हवणे, विलासराज बागुल, शहर कार्याध्यक्ष मिलिंद हांडोरे, रूपचंद साळवे, सिद्धार्थ गांगुर्डे, लक्ष्मीकांत शिंदे, केतन कपिले, जितेंद्र बराथे, गोरख साळवे, अमोल मरसाळे आदी उपस्थित होते. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी नाशिक शहर जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला, विविध संघटना पदाधिकारी व नागरिकांना संपर्क करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.