सुभेदार रामजी नगर, हर्सूल औरंगाबाद येथील भीमशक्ती बुद्ध विहारासमोरील बुद्धमूर्तीची समाजकंटकाने दिनांक २ फेब्रुवारी रोजी विटंबना केली. आरोपी फरार असल्यामुळे आंबेडकरी समाज संतप्त झाला असून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ,भडकल गेट येथे समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेते, कार्यकर्ते, क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
२० वर्षापासून बसवण्यात आलेल्या बुद्ध मूर्तीची समाजंटकांनी तोडफोड केली त्याबद्दल भडकल गेट संभाजी नगर येथे जोरदार निदर्शन करण्यात आले. समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेते, कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली त्यात सात दिवसाचा अवधी पोलीस यंत्रणा यांना देण्यात आला आहे.
जर सात दिवसात आरोपींना अटक केली नाहीतर संभाजी नगर शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या प्रसंगी प्रा.डॉ ऋषिकेश कांबळे, राहुल साळवे – क्रांती संघटना प्रमुख, दिपक निकाळजे – आंबेडकरवाडी बहुजन विकास समिती, दिनकर ओंकार – आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ नेते सर्वांनी निदर्शने देवून मोर्चा काढण्या बाबद माहिती दिली
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.