April 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कालकथित रिपब्लिकन नेते मनोजभाई संसारे स्मृती मोफत भाोजन कक्षाचे मंडप उभारणीचे उद्घाटन

कालकथित रिपब्लिकन नेते मनोजभाई संसारे स्मृती मोफत भाोजन कक्षाचे मंडप उभारणीचे उद्घाटन पेरणे गांवच्या सरपंच सौ उषाताई दशरथ वाळकेपाटील यांचे हस्ते व भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे वतिने शौर्यदिन अभिवादनासाठी येणार्या अनुयायांना मोफत भोजन पुरविण्यात येते. यंदा सुमारे ३५ हजार लोकांना भोजन पुरविण्यात येणार असुन सदर कक्षास कालकथित रिपब्लिकन नेते मानोजभाई संसारे यांचे नांव देवुन त्यांच्या स्मृती जतन करण्यात येणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णाताई डंबाळे यांनी दिली.
यावेळी साईनाथ वाळके पाटील वरिष्ठ सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा श्री कानिफनाथ थोरात ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पेरणे श्री दशरथ वाळके पाटील क्रीडा आघाडी अध्यक्ष भाजपा यांचेसह रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण सोनवणे उपस्थित होते.