August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक-९

बुध्द आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टीकोन

हिंदुं समाजाबद्दल बोलताना सर टी. माधवराव म्हणतात, ‘हिंदू समाजा प्रमाणे जो कोणी आचरण करील,पाहिलं व विचार करेल, त्याला एक गोष्ट गंभीरपणे लक्षात येईल की,हिंदू धर्माला सोडून पृथ्वीवरील कोणत्याही धर्मात त्यांच्या इतका सामाजिक वाईट पणा नसावा जी त्यांनी स्वतःच निर्माण केला आहे.”

वरील विचार खऱ्या अर्थाने आणि अतिशयोक्ती शिवाय हिंदू समाजात सुधारणेच्या गरजेचे प्रतिपादन करतो.समाज सुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतिकारी समाज सुधारक व त्यात ही श्रेष्ठ असे तथागत गौतम बुध्द होत.समाज सुधारणेचा इतिहास हाच मुळी बुद्घा पासून सुरु होतो.किंबहुना समाज सुधारणेचा इतिहास हा बुद्धाचा इतिहास सांगितल्याशिवाय अपूर्ण आहे.

. ई.स.५६३ मध्ये सिद्धार्थचा जन्म नेपाल मधील कपिलवस्तू येथे राजघराण्यात झाला. आर्यातील सामाजिक आणि धार्मिक वाईट चालिरितीना कंटाळून बुध्दाने गृहत्याग केला.त्या वेळेच्या दोन सुप्रसिद्ध ज्ञानी तत्ववेत्ता कडून बुध्दाने शिक्षा ग्रहण केली होती.वयाच्या ३५ व्या वर्षी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले .जीवनाच्या ४५ वर्षा पर्यंत बुध्दाने आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती