August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -८

उदा.
१) जोरदार पावसाची भविष्यवाणी
२)कमी पावसाची भविष्यवाणी
३) भरघोस पिकाची भविष्यवाणी
४) अन्नधान्याच्या कमतरतेबाबत भविष्यवाणी
५)शांततेबद्दल भविष्यवाणी
६) अशांततेबद्दल भविष्यवाणी
७) रोगराई बद्दल भविष्यवाणी
७)चांगल्या ऋतुबड्डल भविष्यवाणी
९) शब्दा बद्दल भविष्यवाणी
१०) विविध प्रकारचे मंत्र व काव्य रचणे.
११) उलटसुलट चर्चा.

ब्राम्हणावर विश्वास ठेवून लोक त्यांना भोजनदान देत असत.तरीही ब्राम्हण लोक हलक्या दर्जाच्या कला दाखवून आपली उपजीविका कमवीत असत.

१) विवाह करिता शुभ मुहूर्त काढणे.
२) शांतता कायम करावयाचा दिवस मुकरार करणे.
३) कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस ठरविणे.
४) धन खर्च करण्यासाठी शुभ दिवस ठरविणे.
५) इतरांचे नुकसान करण्या करिता तंत्रमंत्रचा प्रयोग करणे.
६) गर्भपात करण्या करिता मंत्रोच्चार करणे.
७)एखाद्या व्यक्तीला हरविण्या करिता मंत्रोच्चार करणे.
८) सूर्याची पूजा करणे
९)तोंडद्वारे आगीच्या ज्वाला काढणे.
१०) तोंड धुण्या करिता अनुष्ठान करणे.
११) स्नान करण्या करिता अनुष्ठान करणे.
१२) बळी देणे.
१३) लोकांना‌ औषधी वनस्पती देणे.
१४) विविध प्रकारच्या औषधी लोकांना देणे.
१५) मुकेपणा आणण्याकरिता जादूटोणा करणे.
१६) बहिरेपणा आणण्याकरिता जादूटोणा करणे.
१७) भूतबाधा झालेल्या मुलीकडून भविष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे.
१८) जादूच्या आरशा समोर भविष्यवाणी दर्शविणे.
१९) शक्तिशाली देवतेला आव्हान करणे.
२०)भाग्य देवतेला आव्हान करणे.
२१) निश्चित लाभ प्राप्त होताच देवतेला भेट अर्पण करणे.
२२) एखाद्या मनुष्यात नपुस्कत्व उत्पन्न करणे.
२३) एखाद्या व्यक्तीत पुस्कत्त्व उत्पन्न करणे.
२४) घराच्या जागे करिता शुभस्थळ निश्चित करणे.
२५) स्थळांना पावित्र्य बनविणे.
२६) कानात तेल ओतने.
२७)डोळ्यात औषधी घालने.
२८) नेत्र वैद्याचे कार्य करणे.
२९) लहान मुलांच्या वैद्यांचे कार्य करणे.
३०) वेळोवेळी औषधे देणे इत्यादी.

क्रमशः
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती