August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -७

१० . भूतांना पळवीने, ११.सापांचे मंत्र, १२.विष काढण्याची विद्या दाखविणे.विंचू,उंदीर,साप, कावळे,पक्षी इत्यादि ची तंत्रविद्या, १३.संकटाच्या वेळेस मंत्रविद्या प्रयोग, १४.रीतिरिवाज बद्दल नियम सांगणे,. १५.देवतांना अर्पण करण्याकरिता उजव्या पायातून रक्त काढणे, १६.केवळ हात पाहून भविष्यवाणी करणे की हा व्यक्ती भाग्यशाली आहे अथवा नाही, १७.ज्या ठिकाणी घर अथवा क्रीडा शाळा बनत आहे ती जागा शुभ आहे अथवा नाही, १८.दृष्ट आत्म्यांना दूर पलविने ,. १९भूतांना पळविने, २०. मातीच्या घरात वास्तव्य करताना तंत्रता मंत्राचा प्रयोग करणे, २१.सपावर तंत्र मंत्र बोलणे, २२. जहरा वर तंत्र मंत्र बोलणे, २३.विंचवाच्या दांशावर तंत्रमंत्र बोलणे, २४. एखादा मनुष्य किती वर्ष जगेल याविषयी भविष्यवाणी करणे, २५. संकटामधुन बाचवण्याकरिता तांत्रमंत्र दाखविणे.

खाली दर्शविलेल्या वस्तू आणि प्राण्यांच्या चांगल्या अथवा वाईट गुणांचे वर्णन तसेच त्यांची चिन्हे पाहून त्या वस्तूच्या स्थळकलाबड्डल शुभ किंवा अशुभ वर्तमान सांगणे.

रत्न, पोशाख,तलवार, बाण, धनुष्य,स्त्री पुरुष ,मुलगा मुलगी,दास दासी, हत्ती, घोडे, म्हैस, सांड,बैल, बकरे,कोंबडे, कासव, आणि इतर प्राणी.
हलकी सलकी कारणे दाखवून ब्राम्हण स्वतःची जीविका कमवीत असत आणि याकरिता वाईट मार्गाचा अवलंब करीत.
जसे—
मान्यवर निघण्याची वेळ झाली आहे.
गृहप्रवेश आक्रमण करतील आणि शत्रू मागे हटेल.
गृहप्रवेश विजयी होतील आणि आपले प्रमुख हरतील.
विदेशी प्रमुख या बाजूला विजयी होतील आणि आम्ही हरू.
याच प्रकारे हा पक्ष विजयी होईल आणि तो पक्ष हरेल.
निष्ठावान व्यक्तिद्वारे दान केलेल्या अन्नावर जगणारे ब्राम्हण हे जगण्याकरिता खालील बाबीच्या भविष्यवाणी सारख्या वाईट मार्ग अवलंबवित.
१) चंद्रग्रहण होईल.
२) सूर्यग्रहण होईल.
३) नक्षत्राचे ग्रहण होईल.
४) सूर्य आणि चंद्र निघून जातील.
५) सूर्य आणि चंद्र आपल्या पूर्वस्थानी येतील.
६) नक्षत्रे निघून जातील.
७) नक्षत्रे आपल्या पूर्व स्थानी येतील.
८) जंगलात वणवा पेटेल.
९)उल्कापात होईल.
१०) भूकंप होईल.
११) देवतेचा वजप्रहार होईल.
१२) सूर्य आणि चंद्राचा उदय किंवा अस्त..
विविध प्रकारची भविष्यवाणी करून ब्राम्हण वर्ग उदरनिर्वाह करीत असे
क्रमशः
प्रस्तुती – सुनीता रामटेके अमरावती