पोस्ट क्रमांक -५ महाभारतात वर्णन केले आहे की,एका प्रसंगी कृष्ण आणि अर्जुनाने अत्याधिक दारूचे सेवन केले यावरून हे दिसून येते की, आर्य समाजातील .उच्च वर्गब न केवळ मद्य पित असे तर अत्याधिक मद्याच्या आहारी सुद्धा गेलेला होता.याहीपेक्षा शरमेची गोष्ट म्हणजे आर्य स्त्रिया ही मद्याच्या आहारी गेलेल्या होत्या.
राजा विराट ची पत्नी ‘ सुदेशना ‘ ही अत्याधिक मद्य पित असे.केवळ राण्याच मद्यपान करीत नसून समाजाच्या सर्वच स्तरातील स्त्रियादेखील मद्यपान करीत असत.ब्राम्हण स्त्रिया देखील मद्यपान करीत.
कुमारील भट याने ब्राम्हणाच्या मद्यपानाच्या व्यासानावर टीका केली आहे.आर्याच्या यौन अनैतिकतेकडे लक्ष दिल्यास त्यांच्या आजच्या वंशजांना लाज वाटल्या शिवाय राहणार नाही.
टीप.मी येथे साहित्य मधील काही भाग वगळला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.
निकृष्टतेच्या स्तराला पोचलेला ब्राम्हणवाद
प्राचीन आर्य समाजात पुरोहिताच्या व्यवसायावर ब्राम्हणांचा एकाधिकार होता.ब्रम्हणाशिवय कुणीही पुरोहित बनू शकत नसे.धर्माचे रक्षक म्हणून ब्राम्हण नैतिक व अध्यात्मिक बाबीत समाजाचे मार्गदर्शक असत.ब्राम्हणाच्या कृत्याचे अनुसरण समाजाचा अधिनस्त वर्ग करीत असे.परंतु आपणकडे जे प्रमाण उपलब्ध आहे .त्यावरून हे सिद्ध होते की ब्राम्हणांचा वर्ग हा नैतिक रित्या अधोगतीच्या अगदी खालच्या स्तराला पोचलेला होता.एखाद्या ब्राम्हणाला केवळ सात दिवस पुरेल इतकी च अन्न सामुग्री संग्रहित करण्याचा अधिकार होता.परंतु हळूहळू त्यांनी हा नियम मोडला . प्रत्येक वस्तूचा संग्रह करण्याची लालसाच जणु या ब्राम्हण वर्गाला जडली. अन्न,पेय,कपडे,शैया,सुगंधित द्रव्य, इत्यादीचा सग्रह ब्राम्हण लोक करू लागले.
क्रमशः
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर