पोस्ट क्रमांक-४७
त्याचप्रमाणे बौद्ध भारतावरील आक्रमण हे आपल्या घराण्याचे राज्य चालावे या महत्त्वाकांक्षेने एकमेकांशी भांडले.शुंग,कण्व, आंध्र, आदी घराणी प्रभूत्वसाठी आपआपसात लढली. परंतु एका बाबतीत हिंदू भारताच्या मुस्लिम आक्रमका प्रमाणेच त्यांचा एक उद्देश समान होता आणि तो म्हणजे बौद्धांचा आणि बौद्ध धर्माचा नाश ! इतिहासकारांच्या दृष्टीने हिंदू भारतावरील आक्रमणे ही नमूद करावयास योग्य अशी समजली जाऊ शकतील. कारण ब्राम्हणशाही ची बौद्ध धर्माविरुद्धचा आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणाच्या हिंदू धर्मावरील अत्याचारापेक्षा कमी हिंसक वा जालीम नव्हती.जनतेच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर शास्वत परिणाम करण्याच्या दृष्टीने बुध्द धर्मियावरील ब्राम्हणशाही ची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणांपेक्षा इतकी अधिक परिणामकारक होती की,त्यामुळे मुस्लिम आक्रमणे अगदी वरवरची व तात्कालिक स्वरूपाची आढळुन येतील.
. मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्माचा नाश केला नाही किंवा हिंदू जनतेच्या आध्यात्मिक जीवनाला आधार देणाऱ्या सिद्धांताना तत्वांना सुरुंग लावला नाही.परंतु ब्राम्हणी तत्वांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माने जे जीवनमार्गचे धर्माचे सिद्धांत सांगितले आणि शंभर वर्ष जनतेने ज्या तत्वांचा सत्य आणि शस्वत जीवनमार्ग म्हणून स्वीकार केला त्याचाच नाश केला.उपमा बदलून बोलावायचे तर मुस्लिम आक्रमकांनी फक्त न्हाणी घरातील पाणी ढवळले व तेही अगदी अल्प काळासाठी.त्यानंतर या ढवळाढवळीला ते कंटाळले आणि त्यांनी पाण्यातील घटकासह ते पाणी तसेच राहू दिले.हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाला न्हाणीघरातील बाळाची उपमा दिली तर त्यांनी या बाळाला न्हाणी घरातून फेकून दिले नाही.ब्राम्हणशाही ने मात्र बौद्ध धर्माशी संघर्षात या धर्माला त्यांनी बौद्ध धर्माच्या बाळासह न्हाणी घरातून फेकून दिले आणि आपले पाणी न्हणीत ओतले व आपले बाळ त्यात ठेवले.ब्राम्हणशाही ने उद्दात बुद्धापासून वाहत आलेले बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या सुवासिक आणि शुद्ध पाण्याची तुलना करता आपले पाणी किती घाण व गलिच्छ आहे याचा विचार केला नाही.ब्राम्हणशाही ने बौद्ध धर्माच्या बाळाशी तुलना करता आपले बाळ किती विद्रूप व भयानक .आहे याचा विचार केला नाही.ब्राम्हणशाही ने आपल्या आक्रमणाने बौद्ध धर्माचा नाशही केला.इस्लामने हिंदू धर्माची जागा कधीही घेतली नाही इस्लामने हिंदू धर्म नष्ट करण्याचे काम कधीच पूर्णपणे केले नाही ब्राम्हणशाही ने मात्र ते केले.त्यांनी धर्म म्हणून बौद्ध धर्माला बाहेर हाकलले आणि त्याची जागा घेतली.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
.🌹🙏🏻🌹
🇸🇴🇸🇴🇸🇴
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर