March 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -४६

 

११.३१.ज्या ब्राम्हणाला कायदा कळतो त्याने कोणताही गुन्हा राजाच्या निदर्शनास आणण्याची गरज नाही.त्याच्या स्वतःच्या अधिकारात तो ज्याने त्याला दुखविले असेल त्याला शिक्षा करू शकतो.
११.३२. ब्राम्हणांची स्वतःची शक्ती ही राज्याच्या शकतीपेक्षा अधिक असते; म्हणून ब्राम्हणाने केवळ स्वतःच्या शक्तीने आपल्या शत्रूचा नाश करावा.
ब्राम्हणांचे हे दैवैतीकरण त्यांना राजपेक्षा उच्च स्थान देणे ही गोष्ट स्वतः राजा ब्राम्हण असल्याखेरीज अशक्य होते.स्वतः राजा ब्राम्हण असल्याशिवाय व मनुने व्यक्त केलेल्या मता बाबत त्याला सहानुभूती असल्याशिवाय अशक्य होते.पुष्यमित्र ने आणि त्यांच्या वारसांनी ब्राह्मणांचे हे अतिरिक्त दावे ते स्वतः ब्राम्हण आणि ब्राम्हणी धर्माच्या स्थापनेत रस घेणारे असल्याखेरीज सहन करण्यात आले नसते.अगदी शक्य आहे की पुष्य मित्रानेच मनुस्मृती तयार करण्याचे आदेश दिले असावेत आणि ब्राम्हणी तत्वज्ञानाचे ग्रंथ म्हणून त्याला स्थान दिले असावे.
या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर पुष्य मित्राच्या क्रांतीचा एकमेव उद्देश बौद्ध धम्माचा नाश करणे आणि ब्राम्हणी धर्माची पुन्हा स्थापना करणे हे संशयितीतपणे सिध्द होते.
भारताच्या राजकीय इतिहासाचा वरील सारांश या प्रकरणात देण्याची वास्तविक गरज नव्हती.भारताचा इतिहास ज्या पद्धतीने लिहिला गेला आहे त्या बाबतीत मी समाधानी असतो तर वरील सारांश दिलाच नसता.परंतु मी त्याबाबत समाधानी नाही,कारण भारताच्या इतिहासात मुस्लिम विजयावर अतिरिक्त भर दिलेला आहे.मुस्लिम आक्रमणाच्या लाटा वर लाटा एखाद्या वादळाप्रमाणे कशा आल्या त्यांनी रजकर्त्याना कसे पदच्युत केले आणि सर्व लोकांवर कसा प्रभाव निर्माण केला ,यावर कागदांचे भारेच्या भारे लिहिल्या गेले आहेत.भारताचा सर्व इतिहास असा लिहिला आहे की,मुस्लिम आक्रमणाची सूची हीच फक्त अभ्यासायोग्य होती.हे स्पष्ट होते,त्यापेक्षाही अधिक महत्वाची नसली तरी त्या इतकीच महत्वाची इतर आक्रमणे ही होती.हिंदू भारतावर मुस्लिम आक्रमणांनी आक्रमणे केली.त्याचप्रमाणे ब्राम्हणी आक्रमकांनी बौद्ध भारतावर ही आक्रमणे केली हिंदू भारतावरील मुस्लिम आक्रमणे आणि बौद्ध भारतावरील ब्राम्हणी आक्रमणे यात अनेक साम्य स्थळे आहेत.हिंदू भारतावरील मुस्लिम आक्रमक आपल्या घराण्याच्या ,राज्याच्या महत्तवाकांक्षेपायी आपआपसात लढले.अरब, तुर्क, मोगल,आणि अफगाणी हे आपापसात स्वतःच्या प्रभुत्वसाठी लढले.हे खरे असले तरी त्यांच्यात एक गोष्ट समान होती.मूर्तिपूजक धर्म नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय एक समान होते.
क्रमशः
प्रस्तुती  : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹
🇸🇴🇸🇴🇸🇴