March 31, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -४५

 

१२. ९६. वेदांशी मतभेद असणारे जे सर्व सिद्धांत निर्माण होतात आणि नष्ट होता,ते नवे असल्यामुळे अर्थशून्य असतात.
हे पाखंडी मतांचे ज्यांचा उल्लेख मनु पाखंडी असा करतो,ज्यांना नव्या राजाने राज्यातून हद्दपार करावे.गृहस्थाने त्यांना जीवनात व मृत्युनंतर सन्मान करू नये मग हे ते पाखंडी कोण होते? हे नव्या काळातील अर्थशून्य तत्वज्ञान ‌कोणते ? वेदापासून वेगळ्या आधारावर आधारलेले आणि नष्ट होणार असे हे तत्त्वज्ञान कोणते ? मनुने वर्णन केलेले पाखंडी हे बुद्धच होते.आणि मनुने ज्या तत्वज्ञानाला अर्थशून्य असे संबोधले ते बुध्द धर्माचे तत्त्वज्ञान होते.कल्लक भट्ट या मनुस्मृती वरील दुसऱ्या भाष्यकाराने मनुस्मृती ने मनुस्मृतीच्या श्लोकात उल्लेखलेली पाखंडी आणि त्यांचे तत्त्वज्ञान म्हणजे बुध्द आणि बुद्धवाद होय असे स्पष्टपणे म्हटले आहे.
माझ्या निवेदनाला तिसरा आधार मनुस्मृतीत ब्राम्हणांचे जे स्थान आहे त्यावरून स्पष्ट होतो.मनुस्मृतीतील खालील तरतुदी पाहा.

ब्राम्हणांचा दर्जा

१.९३. ब्राम्हण हे ब्रम्हाच्या मुखातून निर्माण झाले असल्याने ,ते प्रथम जन्माला आले असल्याने ,ते वेद म्हणत असल्याने ते सर्व प्राणी मात्राचे स्वामी आहेत.
१.९६. सृष्टीतील ईश्र्वरनिर्मित सर्व गोष्टीमध्ये सचेतन प्राणी हा उत्तम .सर्व साचेतना मध्ये जे बुद्धीवर जगतात असे बुद्धिमान मानव श्रेष्ठ अशा मानवात ब्राम्हण उत्तम असतात.
१. जगात जे जे काही अस्तित्वात आहे, ती ब्राम्हणाची मालमत्ता आहे. कारण ब्राम्हणाची उत्पती ही सर्वश्रेष्ठ आहे.आणि त्या सर्व गोष्टीवर ब्राम्हणांचा अधिकार आहे.
१.१०१. ब्राम्हण फक्त स्वतःचेच अन्न खातो फक्त स्वतःचेच कपडे वापरतो.फक्त स्वतःचीच भिक्षा घेतो. इतर सर्व मर्त्य मानव ब्राम्हणाच्या कृपेने जगतात.
१.३. आपल्या श्रेष्ठत्वामुळे निर्मितीच्या श्रेष्ठत्व मुळे , विशिष्ट प्रतिबंधक नियमांच्या आचारामुळे ,विशिष्ट पवित्रतेमुळे , विशिष्ट पवित्र संस्करा मुळे ब्राम्हण हा सर्व जातीचा स्वामी आहे.
१०.३५. ब्राम्हणांचे वर्णन ” या विश्वाचा निर्माता , शासन करणारा ,गुरु आणि सर्व प्राणिमात्र वर उपकरकर्ता ” असे केलेले आहे.: ब्राम्हणाला कोणी अयोग्य आणि तीव्र शब्दांनी संबोधू नये.
मनुने ब्राम्हणांना असंतुष्ट करू नये असा इशारा राजांना खालील शब्दात दिला आहे —
९.३१३. राजाने तो अधिकाधिक अडचणीत असला तरी ब्राम्हणांचा राग ओढवून घेऊ नये कारण ब्राम्हण रागावले तर त्याचा सैन्याचा , त्यांच्या वाहनांचा ताबडतोब नाश करू शकतात.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹
🇸🇴🇸🇴🇸🇴