April 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -४४

 

मनुस्मृतीच्या पूर्वी मानवधर्म सूत्र नावाची संहिता अस्तित्वात होती आणि मनुस्मृती त्यावरच आधारलेली आहे, असेही एक मत ए.परंतु मानवधर्म सुत्राचे अंशही कोठेही न मिळाल्याने हे मत अग्राह्य ठरविण्यात आले.मनुस्मृती पूर्वी आणखी दोन ग्रंथ अस्तित्वात होते.एक मानव अर्थशास्त्र किंवा मानव राज्यशास्त्र किंवा मानव राजधर्म शास्त्र . दुसऱ्या ग्रंथाचे नाव मानव गुह्यसु त्र असे होते.विद्वानांनी त्याची तुलना मनुस्मृतीशी केलेली आहे. महत्वाच्या बाबतीत मनुस्मृती व या ग्रंथात वेगळेपण तर आहेच .पण अनेक ठिकाणी सर्व बाबतीत या दोन ग्रंथातील तरतुदी आणि मनुस्मृतींतील तरतुदी यात परस्पर विरोध आहे.यावरून हे स्पष्ट होते की मनुस्मृती ही नव्या राज्यातील नवी आचारसंहिता आहे.
पुष्य मित्राची नवी राजवट बुध्द धम्माविरोधी होती.याचा पुरावा मनुस्मृतीत बौद्ध आणि बौद्ध धम्म यांच्यविरुद्ध जे उल्लेख आहेत त्यावरून स्पष्ट होते.मनुस्मृतीतील खालील तरतुदी पाहा :
९.२२५.जे लोक नास्तिक किंवा पाखंडी (बौद्ध) आहेत त्यांना राजाने राज्यातून हाकलून द्यावे.

९. २२६. वेषांतरीत दरोडेखोर राज्यात राहून सतत त्यांच्या गैरकृत्यामुळे प्रतिष्ठित प्रजाजनाना ईजा पोचवितात.
५.८९. जे धर्मकृत्यांची उपेक्षा करतात त्यांचा जन्म निर्थरक होय.जे मिश्र जातीच्या संयोगाने जन्माला येतात आणि पाखंडी मताचे सन्याशी आहेत व ज्यांनी आत्महत्या केली आहे अंशाच्या आत्म्यांना पाण्याची आहुती देवू नये.
५.९०.ज्या स्त्रियांनी पाखंडी (बौद्ध) पंथ स्वीकारला आहे त्यांची आत्म्यासाठी पाण्याचे तप्रंन करू नये.
४.३०.गृहस्थाने शब्दानेही पाखंड्याच्या वेद विरोधी तर्किकांचा सन्मान करू नये.
१२.९५. वेदावर आधारित नसलेल्या सर्व प्रकारच्या निंदस्पद तत्वज्ञानाचा पद्घती आणि त्यांच्या सर्व परंपरा यामुळे मृत्युनंतर सदगती मिळत नाही.कारण त्या आधारावर आधारलेल्या असतात.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
..🌹🙏🏻🌹
🔰🔰🔰