पोस्ट क्रमांक -४३
मनुस्मृती ही ईश्र्वरी आहे असे मानण्यात येते. मनुस्मती स्वयंभू निर्मात्याने मनुला सांगितली आहे.आणि मनुने ती मानवांना सांगितली, असे सांगण्यात येते.ही गोष्ट प्रत्यक्ष मनुस्मृतीतही सांगण्यात आली आहे.कोणीही या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याची प्रयत्न केला नाही.त्याचा परिणाम भारताच्या इतिहासात मनुस्मृतीचे स्थान, महत्व,व गाभा काय याबद्दल जाणीव निर्माण करण्यात पूर्ण अपयश आले.मनुस्मृती ही हिंदू समाजातील सर्वात मोठ्या क्रांतीचे प्रतीक आहे.तरीहिन भारतीय इतिहासकारांनी ही अपयश आले आहे. मनुस्मृती ने तिच्या लेखनाच्या उगमाबाबत केलेला दावा हा पूर्णपणे खोटा व फसवणूक करणारा आहे आणि या खोट्या दाव्यातून निर्माण झालेल्या धारणा या टिकन्यासारख्या नाहीत.
भारताच्या प्राचीन इतिहासात मनु या नावाला फार मोठी प्रतिष्ठा आहे.या प्राचीन नावाची प्रतिष्ठा या स्मृतीला लाभावी म्हणून मनुचे नाव त्याला जोडण्यात आले.हा लोकांना फसविण्यासाठी केलेला बनाव आहे,हे संशायातीत आहे.मनुस्मृतीवर प्राचीन काळाच्या रितीप्रमाने भृगू घराण्याच्या नावाची सही आहे.भृगुने रचलेली संहिता ‘ मनुची धर्म संहिता ‘ हे या ग्रंथाचे खरे शीर्षक आहे.या संहितेच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भुगुचे नाव आहे.आणि त्यामुळे आपणाला या संहितेच्या लेखकाच्या घराण्याचे नाव माहित झाले आहे.या ग्रंथात त्याचे स्वतःचे नाव कोठेच सांगण्यात (उल्लेखन्यात ) आलेले नाही.परंतु तरीही ते अनेकांना माहीत होते.इसवी सनाच्या चौथा शतकात नारद स्मृतीच्या लेखकाला हे नाव माहित होते.आणि त्याने हे गुप्त नाव प्रकट केले.नारदाच्या माहिती प्रमाणे मनु -स्मृतींची लेखक ‘ सुमती भार्गव ‘ हा आहे सुमती भार्गव हे दंत कथेतील नाव नाही ती ऐतिहासिक व्यक्ती असली पाहिजे.कारण मेघतिथी या भाष्यकारणे मनु हे एका व्यक्तीने धारण केलेले नाव आहे, असे म्हटले आहे.याप्रमाणे मनु हे नाव सुमती भार्गव या व्यक्तीने धारण केलेले नाव होते.व ही व्यक्तीचं मनुस्मृतिची लेखक होती.
या सुमती भार्गव ने ही संहिता कधी तयार केली ? या रचनेचा निच्छित काळं सांगणे शक्य नाही.परंतु ज्या काळात ही संहिता लिहिली गेली त्याबद्दल सांगता येईल. ज्यांचा अधिकार निर्विवाद आहे अशा वीद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे सुमती भार्गवाने ही संहिता ख्रिस्तपूर्व १७० ते १५० या काळात लिहिली असावी.तिला मनुस्मृती हे नाव जाणीवपूर्वक दिले असावे.पुष्य मित्राने मौर्याच्या बौद्ध शासाना विरूध्द ब्राम्हणी क्रांतीची तत्त्वे ग्रंथीत करणाऱ्या मनुस्मृतिला कायद्याचे स्वरूप दिले.ब्राम्हणी व्यवस्थेचे मनुस्मृती हे स्वरूप होते आणि पुष्य मित्राची क्रांती ही वैयक्तिक साहसवादातुन केलेली नसून ती ब्राम्हणी विरूध्द संस्कृतीच्या स्थापनेसाठी केली होती.ही गोष्ट मनुस्मृतीच्या काळात खालील वैशिष्टयावरुन स्पष्ट होते.
पहिली गोष्ट ही की पुष्य मित्राच्या काळात मनुस्मृतिचा नवीन कायद्याची संहिता म्हणून अंमल झाला.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
… 🌹🙏🏻🌹
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर