पोस्ट क्रमांक -४२
पुष्यमीत्राचा स्वतःचा आचार ( वर्तन ) हा पहिला पुरावा आहे.पुष्यमीत्राने सत्तेवर येताच आश्र्वंमेघ यज्ञ केला ( घोड्यांची आहुती देणे ) .हा वैदिक विधी फक्तं सार्वभौम सम्राटांद्वारा करता येत असे..व्हिन्सेंट स्मिथ यांनी म्हटल्याप्रमाणे :
प्राणी मात्राच्या जीवनाचे अतिशयोक्ति पावित्र्य हे बौद्ध धम्माचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.आणि त्यामुळे अशोकाच्या वैशिष्ट्यपूर्ण कायद्याने रक्तमय आहुती देणाऱ्या यज्ञावर बंदी घालण्यात आली.अशा प्रकारचे यज्ञात बळी देणे हे काही ब्राम्हण पूजेत अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक मानले जाई.सनातनी ब्राम्हणांना अशा आहुती देणे हे आत्मरक्षणासाठी आवश्यक वाटे.पुष्यमित्रने केलेला अश्वमेध यज्ञ ही या बंदी वरील ब्राम्हणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती.या यज्ञाचा विकास पुढे पाच शतकांनी समुद्रगुप्ताचा व त्यांच्या वारसांच्या काळात झाला.
पुष्य मित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धांवर व बौद्ध धम्मावर भयानक अत्याचाराची विषारी मोहीम सुरू केली, हा याचा दुसरा पुरावा आहे.
पुष्य मित्राच्या काळात बौद्धांचा किती निर्दयीपणे छळ करण्यात आला त्याचा पुरावा पुष्य मित्राने बौद्ध भिक्खू बाबत काढलेल्या एका जाहीर आदेशावरून मिळतो.पुष्य मित्राने प्रत्येक बौद्ध भिक्खू चे शिर आणून देणाऱ्यास सोन्याची १०० नाणी बक्षीस देणारा आदेश काढला होता.
डॉ. हरिप्रसाद शास्त्री यांनी पुष्य मित्राच्या बौद्धांच्या छळाबाबत म्हटले आहे की, ” सनातनी व कर्मठ शुंग साम्राज्याच्या काळात बौद्धांचा जो छळ झाला, त्याचे वर्णन करण्यापेक्षा कल्पनाच करणे योग्य होईल .चिनी अधिकाऱ्यांच्या माहिती प्रमाणे अजूनही बौद्ध पुष्य मित्राच्या नावाचा उच्चार शाप देवून करतात.”
पुष्य मित्राची क्रांती ही फक्त राज्य क्रांतीच असती तर त्याला बोध्द धर्मियांच्या छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हते.ही छळाची मोहीम गझनीच्या महमंदाने हिंदू विरुद्ध काढलेल्या छळाच्या मोहिमे पेक्षा निराळी नव्हती.पुष्य मित्राचा उद्देश मुख्यतः बौद्ध धम्म नष्ट करून ब्राम्हणी धर्माची स्थापना करणे हाच होता याचा हा परिस्थितीजन्य पुरावा आहे.
पुष्य मित्राच्या मौर्यच्या विरूध्द क्रांतीचे मूळ उद्दिष्ट बौद्ध धम्म नष्ट करून त्याच्या जागी ब्राम्हणी धर्म प्रस्थापित करणे हे होते.याचा पुरावा मनुस्मृतिला कायदा म्हणून दर्जा देण्याची घोषणा हा आहे.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर