April 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक –४०

राजहत्या किंवा प्रती क्रांतीचा जन्म ब्राम्हणवादाचा विजय

१) बौद्ध धम्माविरुद्ध ब्राम्हणी उठाव, (बंड)

भारताबाबत बोलताना प्रा. ब्लूमफिल्ड यांनी ‘ वेदांचा धर्म ‘ या विषयावरील व्याख्यानाची सुरूवात “भारत ही एकाहून अनेक अर्थांनी धर्माची भुमिनाशे.” यांचे स्मरण करून केली आहे.आपल्या स्वतःच्या साधनांच्या सह्याने भारताने अनेकविध धर्म आणि पंथ निर्माण केले आहेत.

दुसऱ्या एका अर्थाने ही भारत ही धर्माची भूमी आहे.इतरत्र कोठेही धर्मीक श्रद्धानी आणि आचारानी जीवनाच्या सर्व क्षेत्रात समावेश केलेला दिसत नाही.
या निवेदनात फार मोठे सत्य आहे.भारत ही धर्माच्या संघर्षाची भूमी आहे असे जर त्यांनी म्हटले असते,तर ते सत्याच्या अधिक समीप ठरले असते. कारण भारताच्या इतिहासा इतका धर्माचा प्रभाव इतर कोणत्या देशातील इतिहासावर दिसून येत नाही.भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राम्हणी धर्म यामधील मरानंतिक संघर्ष चा इतिहास आहे.या सत्याची इतकी उपेक्षा झाली आहे की,कोणीही त्याला सहजगत्या मान्यता देणार नाही.इतकेच नव्हे तर ही गोष्ट सर्वस्वी फेटाळून लावणारे थोडे निघणार नाहीत.

यासाठी मी याठिकाणी भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो .कारण जो कोणी भारताचा इतिहास जानू इच्छितो , त्याला भारताचा इतिहास हा ब्राम्हण धर्म व बौद्ध धर्म यांच्या प्रभुत्त्व साठी झालेल्या संघेर्षा खेरीज इतर काही नाही हे समजणे आवश्यक आहे.

भारताच्या इतिहासाची सुरवात ,भारतावर आर्याचे आक्रमण, त्यांनी भारताला आपले वस्तीस्थान बनविणे आणि आपली संस्कृती तेथे स्थापन करणे येथून होते, असे मानले जाते. आर्यांचे गुण कोणतेही असोत, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म,त्यांची समाजव्यवस्था काहीही असो ; पण आपणास त्यांच्या राजकीय इतिहासाचे फार कमी ज्ञान ‌ आहे हे निश्चीत . आर्य हे अनार्या पेक्षा श्रेष्ठ होते असा दावा केला जातो.परंतु आर्यांनी आपल्या राजकीय इतिहासा बाबत बोलण्यासारखे फारसे काही ठेवले नाही हे खरे आहे.भारताचा राजकीय इतिहास नाग नावाच्या अनार्याच्या उदयापासुन सुरू होतो.हे नाग राजे फार शक्तिमान होते.त्यांना आर्य जिंकू शकले नाहीत.आर्यांना त्यांच्याशी शांतता करावी लागली व त्यांना आपल्या समान दर्जाचे मानावे लागले. प्राचीन काळात भारताने जी काही कीर्ती आणि गौरव प्राप्त करून घेतला त्याचे श्रेय या अनार्य नागानाच द्यावे लागेल.या नागानीच भारताला जगात महान व गौरवशाली बनविले.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻