August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -४ सम्राट विराटकडे ‘कंक ‘ नावाचा जुगार विशेषज्ञ होता.हे राजे लोक जुगार केवळ मनोरंजनाकरीता खेळत नसून त्यावर मोठमोठे डाव लावीत असत.या डावात राज्य,आश्रित,नातेवाईक,गुलाम , इत्यादी लावले जात असत. राजा ‘नल ‘ हा पुष्कर सोबत खेळताना जुगारात सर्व काही गमावून बसला .केवळ पत्नी सोडून नल राजाने जुगारात सर्व काही गमावले.यामुळे नल राजाला जंगलात जावून भिकऱ्याचे जीवन जगणे भाग पडले.नल रजाच्याही पुढे जाणारे काही राजे आपणास पहावयास मिळतात.माहाभरतावरून आपणास कळते की पांडवांचा मोठा भाऊ धर्मराज युधीष्ठर जुगारात राजपाट ,लहान भावासह पत्निदेखील गमावून बसला.जुगार खेळणे हे प्रतिष्ठेकरीता आव्हान समजले जायचे आणि जुगाराचे आमंत्रण मिळणे सन्मान व प्रतिष्ठा करिता आव्हान समजले जायचे आणि जुगाराचे आमंत्रण मिळणे सन्मान व प्रतीष्ठेकरीता आव्हान समजले जात असे.जुगार खेळण्या अगोदर जुगाराच्या दृष्ट परिणाम बद्दल यूधीष्ठिर याला चेतावणी देण्यात आली.परंतु जुगार खेळणे ही आपल्या करिता प्रतीष्ठेची बाब आहे असे यूधीष्ठिराने सांगितले.

जुगाराचे व्यसन केवळ राजे व श्रीमंतांनाच नव्हते तर सामान्य लोकही मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असत.ऋग्वेदात जुगार खेळून कंगाल झालेल्यांची अनेक वर्णने पहावयास मिळतात.कौटिल्याच्या काळात जुगार खेळणे इतकी साधारण गोष्ट होऊन बसली की जुगार खेळण्यासाठी परवाना पत्रसुद्धा प्राप्त होत असे व यातून राजाला मोठे उत्पन्न प्राप्त होत असे. दारू पिणे हे दुसरे एक सामाजिक व्यसन आर्याना जडले होते.आर्य समाजात दोन प्रकारचे मद्य पिण्यात येत असे.एक सोम व दुसरी सुरा.सोम यज्ञात पित असत.प्रारंभी ब्राम्हण,क्षत्रिय आणि वैश्यानाच सोम पिण्याची परवानगी होती.नंतर ब्राम्हण व क्षत्रिया व्यतिरिक्त वैश्य आणि शूद्रना सोम पिण्याची परवानगी होती. नंतर ब्राम्हण व क्षत्रिया व्यतिरिक्त वैश्य आणि शूद्र यांना सोम पिण्यापासुन प्रतिबंध करण्यात आला.सोम बनविण्याची प्रक्रिया ही एक गुप्त गोष्ट होती. जी केवळ ब्राम्हणांना च माहित होती. सुरापानाचि अनुमती मात्र सर्वानाच होती.ब्राम्हण देखील सुरापान करीत असत. असुरांचे पुरोहित शुक्राचार्य ने इतके मद्यपान केले की नशेतच त्याने कचाला ‘ संजीवनी मंत्र ‘ सांगून टाकला.या मंत्राने शुक्राचार्य देवाद्वारे युद्धात मारल्या गेलेल्या मृत असुरांना जिवंत करीत असे. ‘कच ‘ हा देवाचा पुरोहित बृहस्पतिचा पुत्र होता.

क्रमशः
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती