पोस्ट क्रमांक – ३८
१५) वरील पाच विषय व्यतिरिक्त खालील विषयांचा पुराणात समावेश करण्यात आला आहे.
अ) स्मृती धर्म –१) वर्णाश्रम धर्म, २) आचार, ३) अहमिका,४)भाषा भाष्य, ५)विवाह, ६) अशौच,७) श्राध्द,८)द्रव्यशुद्धी,९)पताका, १०)प्रायचित्त, ११) नरक,१२) कर्मवीषयक,१३) युगधर्म.
ब) व्रत धर्म –व्रत ठेवणे पर्व पाळणे .
क) क्षेत्रधर्म*–तीर्थ यात्रा आणि
ड) *दान धर्म * –दान पुण्य करणे.
१६) प्रत्येक पुराण एखाद्या विशिष्ट देवतेशी संबधित आहे.त्याच देवतेच्या आराधना पद्धतीचे वर्णन त्यात सांगितलेले असते.जेणेकरून ती देवता प्रसन्न होईल.अठरा पैकी पाच पुराण विष्णुपुजेसंबधी जोडलेले आहेत.ते असे :
१) विष्णु ,२) भागवत, ३) नारद, ४) वामन, ५) गरुड.
आठ पुराण शिव पुजेसंबधी आहेत ते असे:
१) शिव, २) ब्रम्ह, ३) लिंग, ४) वराह, ५) स्कंद, ६) मत्स्य,७) कुर्म,८)ब्रम्हांड .
एक पुराण –पदम पुराण ब्रम्ह पुजेवर आधारित आहे.
एक पुराण — सुर्य पूजेवर आधारित आहे.
शेवटचे पुराण –गणेश पुजेवर् आधारित आहे.
१७) देवांनी वेळोवेळी घेतलेले अवतार व त्यांचे वेगवेगळे स्वरूप कोणते आहे, हाच पुराणातील मुख्य विषय आहे. पुराणांच्या म्हणण्यानुसार ईश्र्वर एक आहे ;परंतु त्याचे स्वरूप वेगवेगळे आहेत.अर्थात तो दोन नावाला ओळखलं जातो. ईश्र्वर जेव्हा मनुष्याच्या रूपात जन्म घेतो तेव्हा तो चमत्कार आवश्य दाखवीतो.
१८) अवतारा बद्दल विस्तृत वर्णन विष्णु पुराणात वर्णन करून सांगितले आहे.कारण विष्णुनेच वेळोवेळी मानवी कीवा पशू स्वरूपात धारण करून काही ना काही चमत्कार अवश्य दाखविलेला आहे.
१९) विष्णूने मानव व पशू ज्यात वेळोवेळी घेतलेल्या अवताराची विस्तारपूर्वक चर्चा या पुराणात करण्यात आली आहे.
२०) नवनवीन विषय वेळोवेळी पुराणात समाविष्ट करण्यात आल्या मुळे पुराणांचे मुळ स्वरूप पूर्णतः बदलून गेलेले आहे.
२१).सुरवातीला पुराणावर ब्राम्हणेतरांचा (सुतांचा) एकाधिकार होता.या पुराणाची रचना अथवा पठणाशी ब्राम्हणांचा लेशमात्रही संबंध नव्हता.
२२) परंतु एक वेळ अशी आली की,ब्राम्हणेतरंच्या (सुतांच्या) हातातून ब्राम्हणांनी हा पुराण वाचण्याचा व्यवसाय हिसकावून घेतला.अशाप्रकारे पुराणांचे रचनाकार बदलण्यात आले.आता ब्राम्हणेतरऐवजी ब्राम्हण या पुराणांचे रचनाकार बनले.
२३) ब्राम्हणांच्या हाती पुराणे पडताच ब्राम्हणांनी यात नवनवीन विषय घुसडून पुराणांची नवीन आवृत्ती तयार केली. या ब्राम्हणाद्वारे पुराणात आमूलाग्र बदल करण्यात आला व संपूर्ण मुळ विषय बदलून यात संशोधन करून नवीन विषय घालण्यात आले.जुने विषय बदलून नवीन विषय जोडले गेले व नाव मात्र जुनेच देण्यात आलेत .अशाप्रकारे क्रमवार बदल पुराणात करण्यात आले.
२४) पुराणांचा निर्मिती काळं ठरविणे ही बाब मात्र कठीण आहे.जे जे ब्राम्हण साहित्य ब्राम्हणांनी लिहिले त्यात त्यांचा निर्माण काल न लिहिण्यात ब्राम्हण जाणीवपूर्वक सावध होते.पुराण सुद्धा याला अपवाद नाही.
२५) पुराणांच्या काळ निर्धराणासंबधी मान्यताप्राप्त संकल्पनांनाच ‘साक्ष ‘ म्हणून आपणास आधार घ्यावयाचे आहे.
२६) इतर ब्राम्हणवादी साहित्य लिखाणाच्या निर्मिती काळावर बरेच संशोधन झालेले आहे.परंतु पुरानावर मात्र संशोधन झालेले नाही.या बाबतीत विद्वानांनी वैदिक साहित्यावर जेवढे लक्ष दिले आहे तेवढे मात्र या पुराणावर दिले नाही.
२७) माझ्या माहिती नुसार श्री ‘ हाजरा ‘ यांनी पुराणांच्या कालनिर्मितीवर कार्य केलेले आहे त्यांनी दर्शविलेला कार्यकाळ खालीलप्रमाणे आहे:
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर