पोस्ट क्रमांक -३६
वेदान्त सुत्रावरिल ही भाष्ये प्रत्यक्ष वेदान्त सुत्रापेक्षा अधिक महत्वाची मानण्यात येऊ लागली.यांचे वैशिष्ट्य हे आहे की या पाच आचार्यांनी एकाच वेदांत सूत्रांच्या संकलनाच्या आधारावर पाच वेगवेगळ्या विचार पद्धती शोधून काढण्याचा प्रयत्न केला.शंकराचार्यांचे मते वेदान्त सूत्रे एकेश्र्वरिय व अद्वैत तत्त्वज्ञान शिकवतात.तर रामानुजाचार्यच्या मते विशिष्ट्य अद्वैतवाद, निंबारकांच्या मते एकात्मिक द्वैतवाद, माधवाच्या मते द्वैतवाद वल्लभाचार्याच्या मते शुध्द अद्वैत .या संज्ञाच्या अर्थाविषयीची चर्चा मी आता करणार ए. एकाच सूत्राच्या संकलनाचे पाच वेगवेगळे अर्थ लावून त्यावर पाच वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती का निर्माण करण्यात आल्या ? हा फक्त व्याकरणाशी संबधित प्रकार आहे की या पाच वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती निर्माण करण्यामागे काही कारणे आहेत ? या अनेकविध भाष्यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. वेदान्त सूत्रावर पाच वेगवेगळी भाष्ये असली , त्यातून ईश्र्वर व व्यक्तीनिहाय आत्मा यांचा विचार करण्याच्या पाच वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असल्या तरी खऱ्या अर्थाने त्या दोनच पद्धती आहेत.शंकराचार्यांचा दृष्टीकोन व इतर चार जणांचा दृष्टीकोन .कारण बाकीच्या चार जनात मतभिन्नता असली तरी त्या चारही जणांच्या दोन मुद्द्यावर शंकराचार्यांशी असणारा विरोध सारखाच आहे – १) ईश्र्वर व आत्मा एकच असल्याचा मुद्दा.२) जग हे भ्रम आहे हा सिद्धांत. यातूनच तिसराच एक प्रश्न निर्माण होतो.बाद्रायाणाच्या वेदान्त सुत्रातून शंकराचार्यांनी इतका वेगळा सिद्धांत का काढला ? सूत्राच्या चिकित्सक अभ्यासातून हा सिद्धांत काढण्यात आला काय ? की काही उद्देश आधी ठरवून त्यासाठी सोयीचा असा (अर्थ) सिद्धांत शंकराचार्यांनी काढला आहे ?
या ठिकाणी मी फक्त प्रश्न उपस्थित केले आहेत.येथे त्यांच्यावर चर्चा करणार नाही.येथे मला फक्त या भाष्याच्या काळा संबंधी चर्चा करावयाची आहे.या भाषांचा काळ बुद्धपूर्व काळं आहे की बुद्धोत्तर , हा यावेळी आपल्या पुढे प्रश्न आहे.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर