August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -३४

 

वैदिक साहित्य हे प्रचंड प्रमाणात वाढले आणि ते जंगली गवता प्रमाणे अस्ताव्यस्त स्वरूपात वाढले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.या गोंधळातून काही पद्घती, काही सुसंगती निर्माण करणे आवश्यक होते. वेदांतात सुसंगतता निर्माण करण्याच्या गरजेतून ‘ मिमांसे ‘ चां जन्म झाला.वैदिक साहित्याच्या पवित्र ग्रंथातील सुसंबद्ध अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न झाला.वेदातील साहित्यात पद्धतशीरपणा आणि सुसूत्रता आणावयाची होती. त्यांनी स्वतःला दोन विचार शाखात विभागले.एका शाखेने ‘कर्मकांड ‘ चे दुसरीने ‘ ज्ञानकांड ‘ चे सुसूत्रीकरण केले.त्यामुळे वैदिक साहित्याच्या दोन शाखा बनल्या — एक पूर्वमिमांसा व दुसरी उत्तरं मीमांसा. पूर्व मिमांसेमध्ये वैदिक साहित्यातील पहिला भाग — वेद व ब्राम्हणे यांचा समावेश आहे.त्यामुळेच त्याला पूर्व (आधीची ) मीमांसा असे नाव पडले.उत्तर मिमांसेत वैदिक वाड:मयाचा नंतरचा भाग आरण्यके व उपनीषदे यांचा समावेश आहे आणि म्हणूनच त्याला उत्तर ( नंतरची ) मीमांसा असे म्हणतात.

मीमांसा शास्त्राच्या दोन शाखांशी संबधित साहित्य विपुल आहे.यापैकी दोन सूत्रांचे संग्रह मीमांसा शास्त्रात प्रमुख समजले जातात.यापैकी एका सूत्र संग्रहात लेखक जैमिनी व दुसऱ्याचा बादरायण ज्ञानकांडाबाबत चर्चा करतो.जैमिनी व बादरायणाच्या पूर्वीही इतर लेखकांनी या विषयावर लेखन केले होते यात संशय नाही.परंतु जैमिनी व बादरायण यांची सूत्रे म्हणजे मीमांसा शास्त्राच्या दोन शाखावरील अधिकृत लेखन समजले जाते.

दोघांचीही सूत्रे मिमांसेबाबंत असली तरी जैमिणीच्या सुत्राना ‘ मीमांसासुत्रे ‘ असे म्हणतात.तर बादरायणाच्या सुत्राणा ‘ वेदांत सूत्रे ‘ असे म्हणतात वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांचा अंत म्हणजे शेवट असा होतो.त्यात उपनिषदांचा समावेश होतो.उपनिषदे ही वेदांची अंतिम उदिष्ट आहे. बादरायणाची सूत्रे वेदांच्या या भागांचे सुसूत्रीकरण पद्धतशीरपणे करतात, म्हणून त्यांना ‘ वेदान्त सूत्रे असे म्हणतात वेदांच्या अखेरच्या भागात संजयला वृत्तात देण्याचा आदेश दिला.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹