पोस्ट क्रमांक -३२
१६. निरनिराळ्या दंतकथा, छोट्या मोठ्या ऐतिहासिक कथा स्वात्रतपणे विखुरलेल्या होत्या .त्या सौतिने भारतात समाविष्ट केल्या.त्या नाहीशा होऊ नयेत वा एकत्रित वाचावयास मिळाव्यात हा यामागे सौतीचा उद्देश होता.
१७. भारत हे ज्ञानाचे व व्यासंगाचे भांडार बनावे ही सौतीची दुसरी महत्त्वाकांक्षा होती.म्हणून त्याने भारतात राजकारण , भूगोल, धनुर्विद्या आधी ज्ञानाच्या सर्व शाखांचा अंतर्भाव केला.
१८.पूनेरुक्कतीची सौती याला सवय असल्याने भारताचे ‘ महाभारत ‘ बनले यात संशय नाही.
या ग्रंथाच्या प्रतेक आवृत्तीचा काळं ठरविणे अतिशय कठीण आहे.याचा सर्वकष विचार करून.प्रा. हॉपकिन्स म्हणतात,
१८. महाभारताचा सर्वसाधारणपणे काळं ई.स. २०० ते ४०० या दरम्यान असावा.परंतु नंतर या ग्रंथात जो जादा मजकूर पुढील आवृत्त्यात समाविष्ट करण्यात आला.त्याचा या कालनिश्चीतीत विचार करण्यात आलेला नाही. त्याच प्रमाणे या ग्रंथाचे पुनर्लेखन करताना त्यानंतरच्या नक्कल करणाऱ्यांनी जे शाब्दिक फेरबदल केले असतील तेही यात गृहीत धरलेले नाहीत.
१९. परंतु या ग्रंथाचा काळं यापेक्षा नंतरचा असावा असे निश्चितपणे वाटावे अशा काही घटना आहेत.
२०. महाभारतात हूनांचा उल्लेख आहे.स्कंदगुप्ताने हुणांशी लढून त्यांचा पराभव ई.स. ४५५ चे सुमारास केला.परंतु तरीही हुणंचे आक्रमण ई.स. ५२८ पर्यंत चालू होते.या काळात वा त्यानंतर महाभारत लिहिले असावे हे उघड आहे.
२१.आणखी काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे महाभारताचा काळ त्यानंतर चां असावा असे दिसून येते महाभारतात मलेच्छ वा मुस्लिम असाही उल्लेख आहे. महाभारतातील वनपव्रात १९० व्या अध्यायात २९ व्या श्लोकात लेखक म्हणतो, ‘ सर्व जग इस्लामी बनेल.यज्ञ, क्रियाकर्म , धार्मिक कृत्ये सर्व बंद होतील .’मुस्लिमांचा हा प्रत्यक्ष उल्लेख आहे.श्लोकात जरी भविष्यात काय घडेल हे सांगितले असले तरी ते एक पुराण असल्याने त्यात घडून गेलेल्या गोष्टीचा उल्लेख असला पाहिजे हे उघड आहे.वरील श्लोकावरून महाभारत हे मुस्लिम आक्रमणानंतर लिहिले असले पाहिजे, असा अभिप्राय काही जन व्यक्त करतात .
२२. इतरही काही पुरावे या समजुतीला पाठिंबा देणारे आहेत.
याच अध्यायाच्या ५९ व्या श्लोकात असे म्हटले आहे की, वृषलांकडुन छळ झाल्यामुळे भितिग्रस्त झाल्याने आणि संरक्षण करणारे कोणीच नसल्याने ब्राम्हण सर्व पृथ्वीवर दुःखाने आणि वेदनेने विव्हळत व शोक करीत फिरतात.’ या श्लोकात वृषाल म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते बौद्ध धर्मीय असूच शकत नाही त..
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
😁🙏🏻🌹
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर