पोस्ट क्रमांक ३१
३.रामायण
१.माहाभारता प्रमाणेच रामायणाच्या ही तीन वेगवेगळ्या आवृत्त्या निघाल्या असे दिसते.
२. महाभारतात रामायणाचे फोन संदर्भ सापडतात.एके ठिकाणी रामायणाचा उल्लेख आहे. परंतु रामायणाच्या लेखकाचा उल्लेख नाही.दुसऱ्या संदर्भात मात्र ‘ वाल्मिकिचे रामायण ‘ असा उल्लेख आहे.
३. परंतु आजचे रामायण हे वाल्मिकिचे रामायण नाही सी. व्हीं. वैद्य यांच्या मते सध्याचे रामायण हे जरी संशोधक आणि सर्वाच्या आदरास पात्र असलेल्या कटक नावाच्या समीक्षकांनी मान्य केलेले व स्वीकारलेले असले तरी ते वाल्मिकी ने लिहिलेले मूळ रामायण नाही याबाबत अगदी सनातनी विचारवंतानाही संशय नाही.
४. अगदी वरवर रामायणाचे काव्य वाचणार्यालाही ( मग ती बंगाली आवृत्ती असो की मुंबईची ) त्यातील विसंगती, संदर्भहीनता ,जुन्या व नव्या घटनांचे मिश्रण पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.आणि वाल्मिकी रामायणाची पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यात आली असावी याची खात्री होते.
५. महाभारता प्रमाणेच रामायणाच्या तीन आवृत्यात बरीच भर टाकण्यात आली.
६. सुरवातीला रामायण फक्त रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे झालेल्या राम व रावणाच्या युद्धापूर्तेच मर्यादित होते.
७. दुसऱ्या आवृत्तीत या कथेत उपदेशाची भर घालण्यात आली. केवळ ऐतिहासिक कथेऐवजी त्यात तार्किक विचार ग्रंथीत करण्यात आले व सामाजिक नैतिक व धार्मिक कर्तव्याबाबत योग्य मार्ग कोणता ते शिकविण्याच्या उद्देशाने केलेला उपदेश त्यात घुसडून देण्यात आला.
८. तिसऱ्या आवृत्तीत त्यात दंतकथा, शिक्षा, तत्त्वज्ञान, कला व विज्ञान विषयक मजकुराची भर टाकण्यात आली.
९. रामायणाच्या काळा बाबत एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झालेली आहे ती ही की रामाचा काळं हा पांडवाच्या काळापेक्षा खूप जुना आहे.परंतु महाभारताच्या पूनल्रेनाबरोबरच रामायणाचे ही पुर्नलेखन होत गेले ही गोष्ट शक्य आहे की, रामायणातील काही अंश माहाभारताच्या ही पूर्वी रचले गेले असावेत परंतु रामायणाचा बराचसा भाग महाभारताचा बराचसा भाग लिहून झाल्यानंतरच रचला असावा हे निश्चित.
क्रमशः
प्रस्तुती सुनीता रामटेके अमरावती
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर