August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२९

 

२) श्री. टिळकांच्या मते गीतेचा रचानाकाळ ई.पूर्व.५ वे शतक आहे.
३) प्रा. गाव्रे यांच्या मते आज आपणास जी गीता उपलब्ध आहे त्यापेक्षा मुळ गीता वेगळी होती.अलिकडच्या काळात भगवतगीता आपल्यापर्यंत तिच्या मुळ स्वरूपात पोहचली नाही याबाबत भारता बाहेरील बऱ्याच प्राच्य विद्द्या अभ्यासकात एकमत आहे.प्रा. गाव्रे यांच्या मता प्रमाणे भगवत गीतेतील १४६ श्लोक नवीन आहेत.हे श्लोक मुळ गीतेत नाहीत. गितेच्या रचनेच्या काळा बाबत बोलताना प्रा.गार्वे म्हणतात , ‘ इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वी भगवत गीता लिहिली असल्याचे संभव नाही.’
४).राजा बालादित्याच्या काळात भगवत गीता लिहिली असावी असे प्रा.कोसंबी आग्रहपूर्वक प्रतिपादतात. बालादीत्य हा गुप्त घराण्यातील राजा होता.गुप्त घराण्याने आंध्र राजघराण्याची जागा घेतली.बालादीत्य ई.स. ४६७ मध्ये राज्यावर आला. भगवत गीतेची रचना इतक्या उशिरा झाली असे कोसंबी यांनी प्रतिपादन्याची दोन कारणे आहेत.शंकराचार्यांनी भगवतगीतेवर भाष्य करेपर्यंत भगवतगीतेची माहिती कुणालाही नव्हती.शंकराचार्यांचा जन्म ई.स. ७८८ मध्ये.व मृत्यू ई.स. ८२० मध्ये झाला. भगवत गीतेचा उल्लेख शांतरक्षीताच्या तत्वसांग्रहात निश्चितपणे नव्हता.तत्वसांग्रह हा ग्रंथ शंकराचार्य पूर्वी फक्त ५० वर्ष निर्माण झाला.दुसरे कारण असे की वसुबंधुच्या वीज्ञानवादावर टीका आहे. गीतेमध्ये ब्रमहसुत्र भाषेचा संदर्भ आहे.त्यामुळे गीता ब्रम्हसूत्र भाष्याच्या व वसूबंधुच्या नंतर लिहिली गेली असावी असा निष्कर्ष कोसंबी यांनी काढला आहे.वसुबंधू हा गुप्त घराण्यातील राजा बालादित्याचा गुरू होता.या कारणा मुळे गीता बालादित्याच्या काळात वा नंतर लिहिली असावी.
७) गीतेमध्ये एके ठिकाणी ‘ ब्रम्हसुत्र ‘ चां उल्लेख सापडतो.या ब्रमहसुत्रात विज्ञानवादी सांप्रदायाचा जनक वसुबंधु यांची टीका आपणास वाचावयास सापडते. ‘ वसूबंधु ‘ हा गुप्तवंशीय नरेश बालादित्य यांचा गुरु होता.यावरून हे सिद्ध होते की, गीतेची रचना बालादित्याच्या शासनकाळात ई.स.४६७ च्या आसपास करण्यात आली.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती