August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२५

१९३८ साली इलाहाबाद येथे झालेल्या भारतीय इतिहास काँग्रेसच्या ‘ प्रारंभिक आणि मध्यकालीन राजपुतांचा अभ्यास ‘ या विषयावर अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात प्रो.सुरेंद्र जैन म्हणाले होते की, भारताच्या मध्यकालीन इतिहासासंबधी दोन समस्या आहेत ज्यांचे समाधानकारक उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही.त्यांनी ज्या दोन समस्यांचा उल्लेख केला,त्यातील एक राजपूताच्या ऊत्पतीशी संबंधीत आहेत.तर दुसरी,भारतात मुस्लिम जनसंखेच्या विस्ताराशी संबधित आहे.दुसऱ्या समस्येसंबधी ते म्हणाले.

‘ मला एका प्रश्नावर बोलण्याची अनुमती मिळाली पाहिजे,ज्याचा संबंध पुरातत्वाच्या विषयाशी नाही.भारतातील मुस्लिम जनसख्येच्या विस्तरा बद्दल स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे.सामान्यपणे असे म्हटले जाते की, मुस्लिमांच्या विजय अभियाना बरोबर मुस्लिम जनसंख्येचा विस्तार होत गेला आणि ज्या लोकांना मुस्लिम धर्मात धर्मांतरित करण्यात आले, त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली.जेव्हा आम्ही सीमांत प्रांतात आणि पंजाबातील मुस्लिमांची बहुसंख्य व मुस्लिम बालाधीक्य पाहतो,तेव्हा या विचारणा आधार मिळतो.परंतु या सिद्धांताच्या आधारावर पूर्व बंगालमधील मुसलमानाच्या भारी बहुसंख्यांकतेचे गूढ मात्र लक्ष्यात येत नाही.या गोष्टीची सहज संभावना आहे की,कुषाणाच्या काळापासूनच उत्तर.- पश्चिमी सीमांत प्रांतात तुर्क स्थायिक झालेत आणि त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला.नववीजेत्याशी यांचा धर्मबांधव या नात्याने आलेल्या संबंधाचा हा आधार सांगितला जाऊ शकतो.परंतु पूर्व बंगालमधील मुसलमानांचा तुर्क व अफगाणी लोकांशी निश्चितच संबंध नाही तर इतर दुसऱ्याच कारणाने या क्षेत्रतील हिंदूंनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला.ही अन्य कारणे कोणती ‘ प्रा. सेन यांनी मुस्लिम ग्रंथात मिळत असलेल्या या कारणांचा उल्लेख केलेला आहे.ते सिंधचे उदाहरण देतात.याबद्दल प्रत्यक्ष प्रमाण उपलब्ध आहेत.ते म्हणतात,

” ‘ चचनामा ‘ नुसार ब्राम्हण शासनकाच्या आधी सिंधमधील जनतेने अनेक प्रकारचा अपमान व संकटाना सहन केले.परंतु जेव्हा अरबांनी सिंधवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी अरबांना पूर्ण साह्यात्ता दिली.

क्रमशः

प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती