April 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२४

हरप्रसाद शास्त्री यांच्या मते, भिक्षूंच्या अभावामुळे बौद्ध पौरोहित्यात मोठा बदल घडून आला.ज्यांचे परिवार होते अशा विवाहित लोकांना भिक्षुचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला आणि भिक्षुंचे धार्मिक कार्य संपन्न करावयास सुरुवात केली.काही वर्षांपर्यंत ही परंपरा चालत राहिली.धार्मिक कार्य करताना ही मंडळी मूर्तिकार , शिल्पकार,वाढई,गवंडी, इत्यादी जिविकोपार्जनचे धंदे देखील करीत.पुढे अशा कारागीर लोकांची संख्या खूपच वाढली.हेच लोक धार्मिक कार्य करू लागली.व्यवसाय मुळे गुंतून पडल्यामुळे या लोकांकडे स्वतःच्या ज्ञानज्रनाकरीता ,गंभीर चिंतन आणि विचार करण्याकरिता तसेच ध्यानसाधनेसाठी वेळच मुळी शिल्लक नसे.किंबहुना हे लोक धर्माचंरणात गंभीर नव्हते.

पतनाच्या अवस्थेकडे झुकलेल्या बौद्ध धम्माच्या वाढीची अपेक्षा मुळीच या लोकांकडून केली जावू शकत नव्हती.बौद्ध धम्मात काही सुधार करून त्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या लोकात नव्हते.

ही बाब स्पष्ट आहे की हे नवीन धर्माचरणी लोक मुळ भिक्षूंच्या तुलनेत फारच हलक्या दर्जाचे असून ज्ञानवान तर मुळी नव्हतेच बौद्ध धम्माचे कट्टर विरोधक ब्राम्हण पुरोहितांच्या तुलनेत हे नवीन लोक कमजोर होते.कारण की ब्राम्हणांचा वर्ग हा चतुर आणि धूर्त होता.

ब्राम्हणाच्या तुलनेत हा वर्ग कमजोर ठरला.अर्थात ब्राम्हणांचा वर्ग हा धूर्त लोकांचा वर्ग होता.ब्राम्हण धर्म विनाशापासून कसा बचावला आणि बौद्ध धम्म कसा विनाश पावला याला कारण हे नाही की ब्राम्हण धर्म बौद्ध धम्मापेक्षा श्रेष्ठ आहे .तर याला जर काही कारण असेल तर दोन्ही धर्मातील पौरोहित्याचे विशिष्ट चरित्र आहे.बौद्ध धम्म जनसामान्यतून नष्ट झाला.याला कारण तेथील त्यातील बौद्ध पौरोहित्याचे जनसामान्यांना पुनरुज्जीवन करणे शक्य होऊ शकले नाही.परंतु ब्राम्हणी धर्म पराजित झाल्यावरही तो पूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही. प्रत्येक जीवित ब्राम्हण हा पुरोहित व पुजारी बनला आणि प्रत्येकाने ब्राम्हण पुरोहितांचे स्थान ग्रहण केले. बहुसंख्यांक बौद्ध जनतेद्वारे इस्लाम धर्माचा स्वीकार हासुद्धा बौद्ध धम्माच्या रंह्साला कारणीभूत ठरला,यामध्ये कुठलीही शंका नाही.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती

🌹🙏🏻🌹