August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२३

ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, धार्मिक पुजेसंबधी ब्राम्हण पुरोहित व ब्राम्हण गृहस्थ यांच्यात जास्त अंतर नसते. गृहस्थ ब्राम्हण हा पुरोहित ब्राम्हण पेक्षा कोणत्याही बाबतीत कमी मानण्यात येत नाही. केवळ धार्मिक मंत्र आणि अनुष्ठान चे बाबतीत गृहस्थाने विशेष योग्यता प्राप्त केली नसल्यामुळे किंवा तो दुसऱ्या व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे ब्राम्हण गृहस्थ हा पौरोहित्य ची कामे करीत नसतो. अन्यथा बहिष्कृत नसलेला कुठलाही ब्राम्हण गृहस्थ,पुरोहित होण्यास योग्य मानला जातो.भिक्षुक हा वास्तविक पुरोहित असतो तर गृहस्थ हा संभावित पुरोहित असतो.अर्थात प्रत्येक ब्राम्हण हा पुरोहित बनू शकतो.

पुरोहित बणण्याकरिता ब्राम्हणाला कुठल्याही प्रशिक्षणाची अथवा दिक्षेची आवश्यकता नसते.केवळ पुरोहित बनण्याची इच्छाच त्याला पर्याप्त आहे. अशा प्रकारे ब्राम्हणी धर्मात ब्राम्हणाकरीता पौरोहित्य कधीही न संपणारी बाब आहे. प्रत्येक ब्राम्हण हा पुरोहित बनू शकतो आणि त्याला आवश्यकता पडल्यास पौरोहित्याच्या कामाकरीता प्रवृत्त केले जाऊ शकते.वाईटातील वाईट ब्राम्हण व्यक्तीला देखील या कामापासून परावृत्त करता येत नाही.परंतु बौद्ध धम्मात मात्र असे शक्य नाही.धार्मिक कार्य करण्याकरिता बौद्ध संस्कारित होण्याची अट आवश्यक ठरते.बौद्ध भिक्षूच्या संहारानंतर धार्मिक संस्कार करणाऱ्या भिक्षूचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे धार्मिक संस्कार करणे जवळपास नाहीसे झाले.गरज असताना गृहस्थ बौद्धांनी संस्कारवीधी करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला.परंतु हा वर्ग समाजावर आपला प्रभाव पाडू शकला नाही.विविध व्यवसायात गुंतल्यामुळे हा गृहस्थ बौद्धांचा वर्ग बौद्ध धम्माला रंह्सापासुन वाचवू शकत नाही.

क्रमशः

प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती