August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२२

अशा प्रकारे बौद्ध भिक्षूचा मुस्लिम आक्रमणांद्वारे संहार करण्यात आला.या आक्रमकांनी मुळावरच घाव घातला.बौद्ध भिक्षूचा संहार करुन ईस्लामने बौद्ध धम्माची हत्या केली.हे एक मोठे संकट होते.जे बौद्ध धम्माच्या विनाशाला कारणीभूत बनले.प्रचलित विचारधारे प्रमाणे धर्माचा प्रसार केवळ प्रचाराद्वारेच होतो.जर प्रचार असफल ठरला तर धर्म नष्ट होतो.इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूवरच मोठा आघात केला.यामुळे तो नष्ट झाला किंवा भारता बाहेर निघून गेला.धर्माचा प्रकाश प्रज्ज्वलित करण्याकरिता कुणीही जिवंत राहिला नाही.

निश्चितच हीच बाब ब्राम्हणी पौरोहित्यलादेखील लागू पडते.एवढ्या मोठ्या प्रमाणात नसेलही, परंतु काही प्रमाणात मात्र निश्चितच लागू आहे.या दोघांतील अंतर हे या धर्माच्या संघटनेशी संबंधित आहे.या अंतरातील फरका मुळेच ब्राम्हणी धर्म मुस्लिम आक्रमणानंतर ही टिकून राहिला हे अंतर पुरोहित वर्गाशी संबधित आहे.ब्राम्हणवादी पौरोहित्याचे एक व्यापक असे संघटन राहिलेले आहे.

रामकृष्ण भांडारकरांच्या मते, प्रत्येक ब्राम्हण कुठल्याणा कुठल्या वेदांच्या विशेष शाखेशी संबधित असतो व त्याच्या घरातील संस्कार वेदातील सूत्रानुसार होत असतात.त्याच्या करिता वेदांच्या श्लोकाना कंठस्थ करने अनिवार्य असते ही बाब मध्य काळात लागू होती.परंतु बनारस सह संपूर्ण देशात कुठेना कुठे ब्राम्हणाद्वारे वेदपठण होत असे व ही बाब आजतागायत चालत आलेली आहे.

आपल्या व्यवसायानुसार प्रतेक वेदाचे ब्राम्हण हे दोन वर्गात विभागलेले आहेत गृहस्थ आणि पुरोहित गृहस्थ सांसारिक गृहकार्यात तर पुरोहित वेदांचे अध्ययन, पठण, व अध्यापन कार्यात आणि धार्मिक कर्मकांडात मग्न असतो.

हे दोन्ही वर्गातील लोक दररोज संध्या वंदन व सकाळ संध्याकाळ पूजा -अर्चा करीत असतात वेगवेगळ्या वेदानुसर पूजा -अर्चादेखील वेगवेगळ्या असतात.परंतु गायत्री मंत्राचे पठण पाच वेळा,नंतर अठ्ठावीस वेळा आणि शेवटी एकशे आठ वेळा आणि शेवटी आठ वेळा करणे ही सामान्य बाब असते. प्रत्येक धार्मिक पूजेच्या वेळी हे करणे आवश्यक ठरते.

याशिवाय प्रत्येक ब्राम्हण दररोज ‘ ब्रम्हयज्ञ ‘ नावाचा धर्मिक अनुष्ठान करतो.यामध्ये अनेक संहिता, महाभारत,निरुक्त, खंड, ज्योतिष्य, शिक्षा,पाणिनी,याज्ञवल्यक स्मृती व कणाद स्मृती,जमिनी, आणि बादरायणचे सूत्र इत्यादी पठ्णात सामील असतात.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके, अमरावती