August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -२०

जयपाळ (९६०-९८०), आनंदपाल (९८०-१०००),त्रिलोचनपाल (१०००-२१), हे सर्व ब्राम्हण धर्मावंलबी शासक होते.सुबुक्कतगीन ‌आणि मुह्ममद कासिम यांच्या आक्रमणाबद्दल आपण सर्वांनी खूपच वाचलेले आहे. मुह्म्मद गझनीच्या आक्रमणांनी सुरवात झालेले व शहाबुद्दीन घोरीच्या नेतृत्त्वात सुरू असलेले मध्य भारतावरील मुस्लिमांचे आक्रमण सतत सुरू होते.त्यावेळी मध्य भारतात हिंदू राज्ये होती.मेवाड (आता उदयपुर.) वर गहलौत यांचे शासन होते. सांभर ( आता बुंदी,कोटा, आणि सिरोही ) वर चौहाणाचे राज्य होते.कत्रोजवर प्रतिहारांचे ,धारवर परमारांचे,बुंदेलखंडवर चंदेलाचे ,अंन्हिलवाडवर चावडंचे तर‌ चेदीवर कलचुरीचे शासन होते.या सर्व रांज्याचे शासक हे राजपूत राजे होते.व राजपूत हे काही कारणामुळे ज्यांची मी नंतर चर्चा करणार आहे, ब्राम्हणवादी धर्माचे कट्टर समर्थक होते.

या आक्रमणाच्या वेळी बंगाल दोन राज्यात विभागलेला होता,पूर्व आणि पश्चिम.पश्चिम बंगालवर पाल वंशाच्या शासनाचे राज्य होते तर पूर्व बंगालवर सेन वंशाचे राज्य होते.पाल हे शत्रिय होते व ते बौद्ध धम्मावलंबी होते.सेन वंशा बद्दल मात्र मतभेद आहेत.अधिकांश विचारांच्या मते,सेन हे प्रारंभी बौद्ध होते.नंतर ते ब्राम्हणी धर्माचे कट्टर समर्थक बनले.
मुस्लिम आक्रमणाच्या वेळी नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे चार राज्ये अस्तित्वात होती.
१) पश्चिमी चालुक्यांचे दक्षिणी राज्य
२) चोलांचे दक्षिणी राज्य
३) पश्चिम तटावरील कोकणात सिलहाडाचे ‌राज्य आणि
४) पूर्व तटावरील त्रिकलींगाचे गंगा राज्य
१२ व्यां शतकात ही राज्ये अधिक शक्ती संपन्न बनली.१३ व्या शतकात तर ही राज्ये स्वतंत्र झाली.ही स्वंत्रत बनलेली राज्ये अशी :
१) देवगिरीचे यादव २) वरंगलाचे काकतीय ३)हैलबिडचे होयासत मदुराचे पांडय तर ५)त्रावणकोर चे चेर राज्य.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती