पोस्ट क्रमांक -१८
इस्लामचा मुर्तीं भंजक या स्वरूपात भारतात प्रवेश झाला. ‘बुत ‘ या शब्दाचा अरबी भाषेत मूर्ती असा अर्थ होतो.तथापि, बहुतेक लोकांना ‘बूत ‘ या शब्दाचा खरा अर्थ माहित नाही. ‘ बूत ‘ हा शब्द अरबी भाषेत ‘बुध्द ‘ या शब्दांचा अपभ्रंश म्हणून वापरतात.अशा प्रकारे मुसलमान विचारवंताच्या दृष्टीकोनातून या शब्दाच्या व्युप्ततिकडे पाहता मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्याचे प्रयाय वाचक शब्द आहेत. मुस्लिमां करिता मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्याचे समानार्थी शब्द आहेत.म्हणून मुर्तिविध्वस करण्याचा उद्देश बौद्ध धर्म नष्ट करणे असा करण्यात आला.मुस्लिम धर्माने भारतातूनच केवळ बौद्ध धर्माला नष्ट केले नाहीतर जिथे कुठे बौद्ध धम्म अस्तित्वात होता त्या सर्व ठिकाणी या धर्माला नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.मुस्लिम धर्माचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी बौद्ध धम्म इराण,इराक,अफगाणिस्थान, गांधार,चीन,आणि मध्य एशियाचा धर्म होता.एकप्रकारे बौद्ध धम्म हा आशियाचा धर्म होता.या सर्व देशात मुस्लिम धर्माने बौद्ध धम्माला नष्ट केले.
या बाबतीत विसेन्ट स्मिथ म्हणतात की,. “सनातनी ब्राम्हण द्वारे केल्या गेलेल्या अत्याचारापेक्षाही मुस्लिम आक्रमणांनी जे भीषण हत्याकांड केले ते कित्येक पटींनी मोठे होते आणि भारताच्या बहुतेक प्रांतातून बौद्ध धम्म नष्ट होण्याला जबाबदार आहे.
या स्पष्टीकरणाने सर्वाचे समाधान होऊ शकत नाही.किंबहुना कुणाचेही याने समाधान होऊ शकत नाही. दोनही धर्मापैकी केवळ एकच धर्म कसा शिल्लक राहिला ? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.हा प्रश्न तर्कसंगत आहे पण उपरोक्त सिद्धांताचे खंडन करू शकत नाही.ब्राम्हणवाद जिवंत राहील आणि त्याचे अस्तित्व टिकून राहिले.
परंतु याचा अर्थ हा आहे की,मुस्लीम मुळे बौद्ध धम्म नष्ट झाला नाही.याचा अभिप्राय हा आहे की,त्या काळात अशी काही परिस्थिती होती,जिच्यामुळे मुस्लिमांच्या आक्रमणांपुढे ब्राम्हणवाद टिकून राहणे शक्य होते. परंतु बौद्ध धम्म टिकून राहणे शक्य नव्हते.जे लोक या विषयावर गंभीरपणे विचार करतील त्यांना तीन कारणे मुस्लिम आक्रमनापुढे ब्राम्हणवादाला टिकून राहण्याचे व बौद्ध धम्म नष्ट होण्याबद्दल आढळून येतील.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
More Stories
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर