August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -१७

बौद्ध धम्माची अवनती आणि ऱ्हास

भारतामधून बोद्ध धम्म नष्ट होण्याबद्दल सर्वानाच अत्यंत आश्चर्य वाटते. ज्यांनी या विषयावर चिंतन केले आहे अशा अनेकांना दुःख ही होते. बौद्ध धम्म भारतातूनच नाहीसा झालेला आहे.परंतु चीन , जपान ,ब्रह्मदेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम,श्रीलंका, मलया,सुमात्रा इत्यादी देशात आजही अस्तित्वात आहे केवळ भारतातूनच बौद्ध धम्म नाहीसा झालेला नाही तर बहुसंख्य हिंदूच्या डोक्यातून ही हिंदू धर्म नाहीसा झालेला आहे.

हे अचानक कसे काय घडले,हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.या प्रश्नांचे कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नाही.परंतु कुणाही व्यक्तीने या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही.या विषयावर विचार करताना लोक एक महत्त्वाची बाब विसरतात,ही बाब बौद्ध धम्माची अवनती आणि रह्यासच्या अन्तराशी संबधित आहे.बौद्ध धम्माच्या अवणतीची कारणे तर स्पष्ट आहेत.परंतु नाशाची कारणे तितकीशी स्पष्ट नाही.
भारतात मुसलमानाच्या आक्रमण मुळे बौद्ध धम्माचा नाश घडून आला यामध्ये कुठलीही शंका नाही.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके, अमरावती.