August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -१६

कुणाबद्दल ही मनात वैरभाव बाळगू नका,सर्व प्राणिमात्र बद्दल दयाभाव ठेवा.संपूर्ण विश्र्वप्रती सद्भभावना ठेवा.मैत्रीपूर्ण आणि शत्रूताविहीन संबंधच जीवनाचा सर्वोत्तम आधार आहे हीच जीवनाची सर्वोत्तम जगण्याची पद्धती आहे हाच खरा बुद्धाचा आदेश आहे.
सर्व प्राणिमात्र बद्दल व्यापक करुणाभाव सवेदना आणि प्रत्येक प्राणीमात्रा बद्दल मैत्री बुद्धाच्या शिकवणुकीची विशेषतः होती आणि जगातील इतर धर्मसंस्थापकात बुद्धाची हीच विशेषता आहे.

बुध्द आपल्या वैशिष्टयपूर्ण शिकवणीमुळे जगातील बहुतेक भागात. आपल्या धर्माचा प्रसार करण्यात यशस्वी राहिले.

मैत्रीऐवढे महत्व बुध्द विवेकाना देत असत.बुद्धाचे ठाम मत होते की जीवनाची सूरवात ज्ञानाने होटेआणी जीवनाची समाप्ती विवेकाने होते.जगाचे कल्याण करण्यासाठीच बुद्धाच्या जीवनाचे प्रयोजन होते.दुःखमुक्ती करण्यासाठीचा मार्ग म्हणजे अज्ञानाचा विनाश करणे होय.

जीवनात जर सुख प्राप्त करावयाचे असेल तर ज्ञान आवश्यक आहे आणि याचा विवेकपूर्ण वापर करूनच मनुष्य सुखी होऊ शकतो.

बुध्द सर्व लोकांना अलौकिक (दैवी ) शक्तीद्वारे एकदम सुखी करतील हा दावा बुध्दाने कधीच केला नाही.ज्याने त्याने स्वतःच स्वतःच्या प्रयत्ना द्वारे ज्ञानाच्या मार्गावर चालून उद्धार करून घ्यावयाचा आहे.बुध्दाने नैतिकतेवर फारच जोर दिलेला आहे.कारण की बुद्धाच्या मते नैतिकते शिवाय ज्ञान हे व्यर्थ आहे.

खालील तीन प्रथाविरुद्ध बुध्दाने महत्त्वाचा भर दिला आहे.
१)बुध्दाने वेदांच्या अधिकार श्रेष्ठतेला (औपचारिकतेला ) नकार दिला
२) धर्म म्हणून बळी प्रथेला विरोध दर्शविला                                                                                                                                         ३) जतीप्रथेला (वर्णव्यवस्थेला ) बुध्दाने प्रखर विरोध केला.

आजच्यासारखी त्याकाळी जतीप्रथा तितकीशी कठोर नव्हती.आंतरजातीय विवाहावर प्रतिबंध नव्हता.व्यवहारात लवचिकता होती. आजच्या सारखी ती कठोर नव्हती.परंतु तत्कालीन समाजात जातिव्यवस्थेचा फैलाव झाला.विषमता ही या जातिव्यवस्थेचा आधार होती आणि याच जातीव्यवस्था विरूध्द बुध्दाने मोहीम उघडली.संपूर्ण समाजावर वर्चस्व गाजवणाऱ्या ब्राम्हणाच्या अहंकाराचे भगवान बुद्ध फार मोठे कट्टर विरोधक होते.
या सर्व बाबींचा पुरावा आपणास कुट दंत सुत्त ,अंबठ्ठ सूत्त, लोहित सुत्त आणि महाविगत राजाच्या गोष्टीवरून बुद्धाच्या नैतिक शिकवणुकीची आपणास कल्पना येते.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती