March 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -१४

भारतात सामाजिक सुधारणेचा इतिहासच मुळी गौतम बुध्दा पासून सुरु होतो.किंबहुना कोणताही समाज सुधारणेचा इतिहास ,बुद्धाचा इतिहास सांगितल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही .
व्यक्तिगत नैतिकतेचे आचरण हाच मनुष्याच्या जीवनाचा खरा मापदंड आहे अशी बुध्दाची शिकवण होती.तत्कालीन समाजाला बुध्दाचे विचार अभिनव व क्रांतीकारी वाटले.
पवित्र जीवनाचे उदाहरण प्रस्तुत करूनच बुध्द थांबले नाही तर समाजातील प्रतेक स्त्री -पुरुषाचे चारित्र्य निर्माण व्हावे असे बुध्दाला वाटत असे. तत्कालीन आर्य समाजाला माहित नसलेल्या दिक्षाविधीची सूरवात बुध्दाने केली ज्याद्वारे लोकांचे मार्गदर्शन होईल.दीक्षा घेणाऱ्यांना बुध्द द्वारे देण्यात. येणाऱ्या नैतिक तत्त्वांचे पालन करण्याची. प्रतिज्ञा‌ या दिक्षाविधी मध्ये घ्यावी लागत असे.
या अभिनव सिध्दांताना पंचशील म्हणतात.ते पंचशील अशा प्रकारचे आहेत :.
१) हत्या न करणे. २) चोरी न करणे. ३) खोटे न बोलणे. ४) व्यभिचार न करणे. ५) मादक पदार्थाचे सेवन न करणे.
हे पाच सिद्धांत सामान्य लोकांकरिता होते तर भिक्खू करिता खालील अधिक पाच सिद्धांत होते :
१) नियमबाह्य भोजन न करणे. २) नृत्य ,गायन, नाट्य, अथवा तमाशे न पाहणे किंवा त्यात सहभाग सुद्धा न घेणे.३) फुलांच्या माळा किंवा सुगंधित द्रव्य आणि अलांकाराचा उपयोग न करणे
४) उंच आसने किंवा शय्येचा वापर न करणे.५) धन संग्रह न करणे.

हे जीवनाचे मापदंड सर्वानाच लागू असावेत अशी बुध्दाची विचारसरणी होती.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती
🌹🙏🏻🌹