January 15, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -१३

मनुष्यबळी नंतर दुसरे स्थान घोड्याचे होते,आश्र्वबळी देनेसुद्धा फार खर्चिक बाब होती.कारण की आर्याच्या सैन्य अभियानात घोड्याला महत्त्वपूर्ण वाहाकांचे स्थान होते.घोड्याचा बळी देणे म्हणजे फार मोठे नुकसान करणे होय.हे आर्यांना माहीत होते.अश्र्वबळी देण्यात आणखी एक संकट होते ते म्हणजे घोड्याचा वध ही फार हिंसक बाब होती.सोबतच अश्वमेध यज्ञ करणाऱ्याच्या पत्नीला घोड्याशी मैथुन देखील करावा लागत असे.
सर्वसाधाणपणे कृषी कार्यात उपयोगी असणाऱ्या पशुंचाच यज्ञात बळी देण्याचे प्रचलन वाढले.त्यात गायी आणि बैल प्रामुख्याने असत.

कौशलनरेश प्रसेनजीत याने करावयाच्या एका यज्ञात‌ बळी म्हणून पाचशे गायी, पाचशे बैल,पाचशे सांड, व पाचशे बकरे आणि पाचशे मेंढ्या खांबांना बांधण्यात आल्या.या सर्व पशुना बळी देण्याच्या कामी जे सेवक चाकरी बजावित होते.त्या सर्व सेवकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.हे बळी यज्ञ एक प्रकारे उत्त्सवासारखे साजरे करण्यात येई.ब्राम्हणांना भाजलेल्या मासाव्यतिरिक्त मादक पेय सुध्दा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे.सोम व सुरा ही दोन्ही प्रकारची मद्ये ब्राम्हणांना देण्यात येत.

जवळपास सर्वच ‌यज्ञात जुगार खेळण्यात येत असे व त्यातही असामान्य गोष्ट म्हणजे आसपासच्या परिसरात खुलेआम सर्रास संभोग चालायचे.
यज्ञ हे ब्राम्हणांच्या आय्याशीचे साधन बनले होते व त्यात कुठलीही नैतिकता आणि धर्म शिल्लक राहिलेला नव्हता.अर्थात तत्कालीन आर्य समाज हा सर्वात घुर्णीत अशा सामाजिक , धार्मिक आणि आध्यात्मिक व्यभिचार मध्ये गुरफटून गेला होता.
समाजाची निकृष्टावस्था बघता तत्कालीन समाजात समाज सुधारणेची आवश्यकता भासत होती.या बाबतीत सर्वप्रथम समाज सुधारणेचा प्रयत्न केला तो तथागत गौतम बुद्धाने.

क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती