August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक-१२

कर्मकांडाद्वारे दक्षिणा प्राप्त करण्याकरिता यज्ञाचे जाळेच संपूर्ण समाजावर ब्राम्हणांनी पसरविले होते.या जाळ्यात सामान्य जनता अलगद फसत असे.यज्ञ‌ करणाऱ्यावर यज्ञाचा बोजा पडत असे, हे यावरून लक्षात येते की, एका यज्ञात दान स्वरूपात देण्यात येणारी दक्षिणा म्हणून एक हजार गायींचा उल्लेख एके ठिकाणी आलेला आहे.एवढ्या मोठ्या लाभाच्या लालचीने ब्राम्हण पुरोहित घोषणा करीत की,जे एक हजार गायी दान देईल,त्याला स्वर्ग लाभ होईल.या बाबतीत ब्राम्हण पुरोहितांच्या तर्क असे की देवदेवतांना प्रसन्न करताना देवता सुद्धा पुरस्काराची मागणी करतात.तेव्हा हा पुरस्कार दान स्वरूपात घेण्याचा अधिकार ब्राम्हणांना आहे.

जीवांचे बळी देणाऱ्या .यज्ञाला ,यज्ञात प्रमुख स्थान प्राप्त होत असे.असे यज्ञ फार खर्चिक व हिंसक असत.या यज्ञात पाच प्रकारचा बळी देण्यात येत असे.यात मनुष्य बळी ला प्रमुख स्थान होते.परंतु नरबळी देणे ही फार खर्चिक बाब होती.नरबळी देण्याबाबत हा नियम होता की नरबळी हा ब्राम्हण किंवा शूद्र वर्गातील नसावा तर तो क्षत्रिय किंवा वैश्य वर्गातील असावा.त्या वेळेच्या किमतीनुसर एका मनुष्याचे मूल्य एक गायी इतके होते.शिवाय नरबळी देणाऱ्यास बळीचा वध करून बळीचे मास खाण्याचा नियम देखील होता.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती