August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -११

.बुद्धाच्या धम्माचा इतका प्रसार होण्याची कारणे कोणती असेल तर ती म्हणजे बुध्दाचा धम्म हा मानवतावादी असून मैत्री,बंधुता,अहिंसा, आणि नैतिक शीलाचरणावर आधारलेला होता.

तत्कालीन आर्य समाज सामाजिक,धार्मिक आणि व्यक्तिगत दुराचरणाच्या निकृष्ट स्तराला पोचलेला असल्यामुळे बुध्दाच्या शिकवणीने समाजात एक क्रांतीच घडून आली.

याप्रमाणे तत्कालीन आर्य समाजातील वाईट चालीरीती चां उल्लेख करणे आवश्यक आहे.

यज्ञात पशुंचा बळी हा ब्राम्हणांचा जिवकोपाजेरणाचा मुख्य धंदा होता.या यज्ञाद्वारे ब्राम्हण देवांना प्रसन्न करीत.

अशा पारंपरिक यज्ञाची संख्या २१ होती.या २१ यज्ञाना सात सात याप्रमाणे तीन वर्गात विभागण्यात आलेले होते.

१) पहिल्या प्रकारच्या यज्ञात दूध,दही, धान्य व तूप इत्यादींची आहुती देण्यात येत असे.
२) दुसऱ्या प्रकारच्या यज्ञात सोमची ( मध ) आहुती देण्यात येत असे.
३)तिसऱ्या प्रकारच्या यज्ञात जीवांचा बळी देण्यात येत असे..
हे यज्ञ अल्पावधी किंवा दीर्घकाळ एक वर्षापर्यंत चालत.यज्ञ केल्याने यज्ञकर्त्यासिबत त्याच्या पितरांचा सुद्धा उद्धार होतो.त्याचबरोबर यज्ञकर्त्यास वैभवपप्राप्तीसोबत च स्वर्गालाभ पण होतो असा तर्क लावून ब्राम्हण यज्ञाचे समर्थन करीत.

बहुतेक यज्ञ ब्रम्हणवर्ग हे पृथ्वीवरील उत्तम वस्तू प्राप्त करण्यासाठी करीत असत.लाभप्राप्ती शिवाय ब्राम्हण लोक यज्ञ करीत नसत.यज्ञ करून आपण समाजाला मूर्ख बनवीत आहोत हे या पुरोहित ब्राम्हणाला माहित होते. प्रत्येक यज्ञानंतर पुरोहिताणा दक्षिणा म्हणून दान वाटण्यात येत असे. दक्षिणा संबंधी ब्राम्हण पुरोहितांचे नियम स्पष्ट असत.दक्षिणा व दान घेण्याच्या हक्काचे ब्राम्हण पुरोहित निर्लज्जपणे समर्थन करीत. केवळ दक्षिणा उकळण्याचा हेतूनेच ब्राम्हण यज्ञ करीत.या यज्ञात दान स्वरूपात ब्राम्हणांना मूल्यवान वस्त्र,गायी ,घोडे, आणि सोन प्राप्त होत असे.यज्ञकर्त्याने ब्राम्हणांना केव्हा काय दान द्यावयाचे आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असे.

क्रमशः .
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती