August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रती क्रांती – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -१०

सुखी जीवनाकरिता जीवनाचा मापदंड म्हणून नैतिक आचरण आवश्यक आहे.अशी बुद्धाची शिकवण होती.समाजाच्या विकाासा करिता बंधुते बरोबरच लोकतांत्रिक भवनाची वृध्दी सुद्धा आवश्यक आहे असा बुद्धाचा उपदेश होता.
बुद्धाचे वर्णन एका श्रेष्ठ ब्राम्हणाने केले आहे.पूज्य गौतम दोन्ही कुळाकडुन श्रेष्ठ कुलीन,विशुद्ध वंशाचे ,दिसायला सुंदर आणि आकर्षक,विश्वासपात्र, गौर वर्णीय ,प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले,उत्तम सद्गुणानी युक्त ,मधुर व शांत व संयमित वाणीचे,स्थिरचित्त असलेले, सर्वाशी उत्तम व्यवहार करणारे ,अहंकार रहित ,मनमिळावू आणि जसे बोलतील तसे वागणारे होते.

त्यांच्या बाबतीत सर्वांना आकर्षित करणारी जर कुठलीन गोष्ट असेल ते सर्व सुखासंपन्नता, धनसंपत्ती, ऐश्वर्य राजपाट असताना देखील तारुण्याच्या अवस्थेत या सर्व सुखांचा त्याग करून संसारत्याग केला.व सन्यासाचे जीवन पत्करले.अशाप्रकारचे जीवन जगण्यासाठी फारच दृढनिश्चय आणि धैर्याची आवश्यकता असते.

बुद्धाच्या बाबतीत म्हटले जाते की,सर्व मानव,प्राणीमात्र,देवलोक,इत्यादीच्या सुखाकरिता बुध्दाने जीवन समर्पित केले होते.बुद्धाच्या व्यक्तिमत्वाची अंमीट छाप तत्कालीन समाजावर पडली.ती इतकी की,आजतागायत भारतीय समाजावर कायम आहे.
बुद्धाचा धम्म लवकरच भारतात प्रसार पावला.थोड्याच काळात तो भारताचा राष्ट्रीय धर्म बनला.केवळ भारता पुरता मर्यादित न राहता जगाच्या सर्व भागात या धर्माचा प्रसार झाला. सर्व जातीच्या व वंशाच्या लोकांनी याचा स्वीकार केला.एवढेच नव्हे तर अफगाणिस्तानच्या लोकांनी सुद्धा बौद्ध धम्म स्वीकारला.केवळ आशिया खंडा पुरता मर्यादित न राहता या बाबीचे प्रमाण मिळते की,बौद्ध धम्माचा प्रसार ब्रिटन पर्यंत झाला होता.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती