August 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रतीक्रांती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक-१

प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश

प्राचीन भारताचा बहुतेक इतिहास हा मुळातच इतिहास नाही.असे मुळीच नाही की प्राचीन भारताला इतिहास नाही. खरे पाहता प्राचीन भारताला बराचसा असा इतिहास आहे. परंतु प्राचीन भारताच्या इतिहासाचे खरे स्वरूप नष्ट झालेले आहे.स्त्रिया आणि लहान मुलांच्या मनोरंजनाकरिता याला पौराणिक आख्यान बनविण्यात आले आहे.यावरून हे दिसते की,ब्राम्हणवादी लेखकांनी हे कृत्य जाणूनबुजून केले आहे.

‘देव ‘ हा शब्द पाहा.याचा अर्थ काय? सामान्य माणसातील ‘ विशेष ‘ व्यक्ती ‘ असा ‘देव ‘ या शब्दाचा अर्थ होतो.अर्थात ‘ महामानव ‘ या अर्थाने. देव या शब्दाचा उपयोग होतो.परंतु देव या शब्दाचा खरा अर्थ नष्ट झालेला आहे. अशा प्रकारे.इतिहासाचा खरं अर्थ लपाविण्यात‌ आला आहे.

देव शब्दासोबतच ठिकठिकाणी यक्ष, गण, गंधर्व,किन्नर इत्यादी नावांचा पण उल्लेख. आढळतो. हे कोण लोक होते ? * महाभारत व रामायण वाचल्या नंतर लक्षात येते की हे काल्पनिक मानव होत ज्याचा वास्तविकतेशी जराही संबंध नव्हता.* ‘ असुर ‘ या नावाकडे बघा.रामायण व महाभारतात ज्या प्रकारे असुरांचा उल्लेख करण्यात आला आहे,त्यावरून हे सिद्ध होते की, असुर. हे मानवरहीत दुनियेतील राक्षस असावेत.
क्रमशः
प्रस्तुती :  सुनीता रामटेके अमरावती 9112892740