नाशिक महानगरपालिका, नाशिक जाहिरात व परवाने (मुख्यालय) विभाग राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक-४२२००२. उत्सव प्रसंगी उभारले जाणारे मंडप / स्टेज, कमान बाबत – जाहिर सूचना
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, बकरी ईद, रमझान ईद, मोहरम, नाताळ, आंबेडकर जयंती, महानिर्वाण दिन, शिवजयंती अशा प्रकारचे विविध उत्सव साजरे केले जातात. सदर उत्सवांदरम्यान मंडप उभारण्यासाठी विविध सार्वजनिक मंडळे महानगरपालिकाकडे अर्ज करतात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २३४ अन्वये पोलीस विभागाच्या सहमतीने मंडप उभारण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी देण्यात येते. मा.उच्च न्यायालयाच्या | निर्देश / आदेशानुसार तसेच मा. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सण / उत्सव प्रसंगी उभारणेत येत असलेले मंडप स्टेज, कमान उभारणेस फक्त ऑनलाईन परवानगी देणे संदर्भात दिनांक ०७/०७/२०२० रोजीचे सुधारित परिपत्रक नाशिक महानगरपालिकेची वेब साईट http://www.nmc.gov.in वर प्रसिध्द करणेत आलेले
सर्व सणांकरीता मंडप बांधण्याकरीता / उभारण्याकरीता परवानगीसाठी अर्ज संबंधित सणाच्या ३० दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिके च्या http://nmcfest.nmc.gov.in या वेब साईटवर ऑन लाईन सादर करावा. सणाच्या समारंभाच्या १० दिवसापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सार्वजनिक उत्सवाच्या वेळी रस्त्यावर तात्पुरता मंडप उभारण्यास नियमानुसार ऑनलाईन परवानगी वरिल परिपत्रकात नमूद केलेनुसार देण्यात येईल.
आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव २०२१ करीता तसेच इतर सण – उत्सवाकरीता, सार्वजनिक ठिकाणी मंडप / स्टेज, कमान उभारणेची ऑनलाईन परवानगी सर्व संबंधीतांनी नियमानुसार वेळेत घेवून मंडप / स्टेज, कमान उभारावे. तसेच परवानगीचा तपशिल मंडप / स्टेज, कमानीचे दर्शनी भागावर उत्सवाचे ७ दिवस अगोदर पासून लावण्यात यावा. तसे न केल्यास, मंडप / स्टेज, कमान अनधिकृत समजून जागेतून काढून टाकणेची नियमानुसार कारवाई करणेत येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
घरी रहा, सुरक्षित रहा व ऑनलाईन परवानगी मिळवा.
जा.क्र. जनसंपर्क / वशि / १६० / २०२१, दिनांक २२/०७/२०२१.
सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने कळविण्यात आले
More Stories
RTE News 2024 : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना शासकीय नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य
1 जुलैपासून आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याच्या जागी भारतातील तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने 6,100 शिक्षकांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली