“खेडेगावात तुमची वस्ती थोडी असते. तुमची उपजीविका येथील स्पृश्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्यासाठी ते तुमची खडकी हाडवळी जातील म्हणून दिशाभूल करतील, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका.
मी आतापर्यंत फक्त दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे (१) मृत मांस न खाणे (२) उच्छिष्ट अन्न न खाणे. भाकरी वगैरे भीक मागून आणण्याच्या प्रकाराविरुद्ध मी आहे. अशामुळे आपण इतरांप्रमाणे मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमानशून्य का व्हावे?
अशा परिस्थितीत मी तुम्हास स्पृश्य लोकांकडे भाकरीसाठी भीक मागा, असे कसे सांगेल. मला येथे जमलेल्या स्रीयांना सांगायचे आहे की, तुम्ही मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची योग्य निगा न करता, इतर स्पृश्य समाजातील मुलाबाळाप्रमाणे वळण लावून त्यांचे शिक्षणाकडे लक्ष न वेधविता गावातून भिक मागीत का फिरविता? तुम्ही मनुष्य आहात. स्पृश्य समाजातील मुले शिकून आपला नावलौकिक काढतात त्याप्रमाणे आपल्या मुलांना का वळण देत नाही. माझ्या सांगण्याप्रमाणे तिथले लोक वागायला लागले, असे कळले तर मला आनंद होईल.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२, पान नं.५४)
दि.७ नोव्हेंबर १९३७ रोजी दौंड जि.पुणे येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमानशुन्य होणार काय ?
More Stories
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न काय होते ? ते पूर्ण झाले का ?
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर की बी.एन. राव – ऐतिहासिक सत्याचे सखोल विश्लेषण Dr. Babasaheb Ambedkar or B.N. Rao – An in-depth analysis of historical truth
बौद्ध अतिरेकीपणाचा धोकादायक उदय: ‘निर्वाण प्राप्त करण्यासाठी वाट पाहावी लागू शकते