January 13, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

श्वानवृत्ती सोडून मनुष्यत्वाची धारणा करा

एका गोष्टीचा मला फार मोठा आनंद वाटतो. हल्लीच्या तुम्हा लोकात समाजकार्याविषयी उत्कट भावना निर्माण झाली आहे. काम करण्याचा तुमचा हा उत्साह पाहून मला अत्यंत समाधान वाटते, म्हणून येथील लोकांचा मी फार ऋणी आहे. माझ्या स्वतःच्या मनात असे वाटते की, वरच्या वर्गाच्या संस्था ज्या उपायांनी कार्य करतात ते उपाय अंमलात आणावे ही चांगले.
शिक्षण घेणे हे जरूर आहे. तुमची सर्वांची अशी भावना झाली आहे की महार म्हणजे सरकारचा भिकारी. भाकरी मागणे हा आपला हक्क आहे असे आपण समजता पण तो खोटा आहे. भाकरी मागणे हे कुत्र्याचे जीवन आहे. ही श्वानवृत्ती आहे. माणसाची नाही. हि वृत्ती आपण सोडली पाहिजे. माणसाची वृत्ती धारण केली पाहिजे. आपण आपली जबाबदारी ओळखली आहे याबद्दल मला समाधान वाटते. आता जास्त न बोलता तुमची जबाबदारी काय आहे याचा तुम्ही विचार करावा.”!!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२, पान नं. ३७३)
रविवार दि. ११ मे १९४१रोजी आर.एम.भट हायस्कूल, परळ- मुंबई, येथे तिसऱ्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.