November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करून घेतली पाहिजेत

“या देशातून एकवेळ इंग्रज लोक जाऊ शकतील परंतु सर्व गरीब जनतेला नागवून तिचे रक्त शोषण करणारा जळवांसारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणार नाही. म्हणून त्याची रक्त शोषक वृत्ती नाहीशी होणार नाही. त्याची भरभराट व्याज घेण्याची आसुरी वासना नष्ट होणार नाही. त्यांची गोरगरिबांच्या घरादारावर निखारे ठेवण्याची बुद्धी नाहीशी होणार नाही.
बहुजन समाजाला सुख मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही असे कायदे सत्ताधारी पक्षाकडून करून घेतले पाहिजेत. आपणास जे थोडे राजकीय हक्क मिळाले आहेत त्यात तूर्त समाधान मानून अधिकारासाठी झगडले पाहिजे. फौजदार, मामलेदार, सर्कल, इन्स्पेक्टर, तलाठी व पाटील यांची हाती सत्ता नाही. महार ज्याप्रमाणे सरकारी नोकर त्याचप्रमाणे ते नोकर आहेत. खरी राज्यसत्ता लोकांच्या हाती म्हणजे कौन्सिलच्या हाती आहे. म्हणून तुम्हास सरकारी नोकरांना भिण्याचे कारण नाही. त्यांनी व इतरांनी तुम्हास त्रास दिल्यास त्याची दाद लावण्यासाठी, तुमची गाऱ्हाणी, दुःखे व जुलुम वेशीवर टांगून, स्वतंत्र मजूर पक्ष ती नाहीशी करण्याचा प्रयत्न करील, असे आश्वासन मी तुम्हाला देतो.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड -१८, भाग-२, पान नं. ५२)
मसूर जि.सातारा येथे दि.६ नोव्हेंबर १९३७,रोजी सातारा जिल्हा महार परिषदेचे सातवे अधिवेशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.