February 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

परित्राण पाठ मराठी मध्ये Paritran Path in Marathi

सर्व संकटांचा नाश करणारे, सर्व संपत्तीचा लाभ करुन देणारे, सर्व रोगांचा विनाश करणारे, दीर्घायुष्याचा लाभ करुन देणारे, सर्व दुःखाचा नायनाट करणारे, निर्वाणाकडे पोहोचवणारे असे मंगल परित्राण पाठ, भन्तेजी कृपया आम्हाला सांगावे.| सभोवतालच्या सर्व श्रेष्ठ सज्जनांनो, निर्वाणपद प्राप्त करुन घेण्याकरिता भगवान बुद्धांच्या सद्धमाला ऐकण्यासाठी इकडे यावे.||१||

होय भन्तेजी ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे.होय भन्तेजी ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे.होय भन्तेजी ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे.||२||

जे शांत चित्ताचे, त्रिसरणाला अनुसरणारे, विविध ठिकाणी राहणारे, सदोदित सत्कार्यात मग्न राहणारे, श्रेष्ठ जनगण, डोंगर दर्या खोर्यात, पर्वतराजीवर वास्तव करणारे आहेत, ते सर्व जण शांत अशा श्रेष्ठ भगवान बुद्धांचेे वचन ऐकण्याकरिता येथे येवोत.||३||

सभोवतालच्या सर्व सज्जनांमध्ये, यक्षांमध्ये आणि ब्राम्हणांमध्ये श्रेष्ठ अशा सर्वांच्या कुशल कर्मामुळे आम्हाला सर्व संपत्ती प्राप्त होवो.त्या सर्वांचे अनुमोदन करुन बौद्ध धम्मात रत होऊन, प्रमादापासून अलिप्त राहून आमचे योग्य प्रकारे रक्षण करोत.||४||

सदोदित बोद्ध धम्माची, त्याचप्रमाणे जगताची वृद्धी होवो, श्रेष्ठ लोक या धम्माचे व जगताचे सर्वतोपरी रक्षण करोत. सर्व कुटुंबियांना व स्वतःला देखील सुख प्राप्त होवो.सर्वांना मानसिक सुखाचा लाभ होवो.||५||

राजभय, चोरभय, मानवीभय, अमानवीभय, अग्नीभय, जलभय(पूर, प्रलय वैगरे)गेंडाभय, कंटकभय, गभय, पापभय, मिथ्याद्रुष्टीभय, दर्जनभय, उन्मत हत्ती, हरिण, बैल कुत्रा, सर्प, विंचू, वाघ, तरस, डुक्कर, रेडा, यक्ष इत्यादि भयांपासून, नाना प्रकारच्या रोगापासून, नाना प्रकारच्या उपद्रवापासून सर्वांचे रक्षण होवोत.||६||

Paritran Path in Marathi | परित्राण पाठ मराठी मध्ये | Buddhism | Buddhist Bharat